लग्नाच्या वऱ्हाडाचा टेम्पो दीडशे फूट दरीत कोसळला; तीन ठार

 लग्नाच्या वऱ्हाडाचा टेम्पो दीडशे फूट दरीत कोसळला; तीन ठार 

पोलादपूर : तालुक्यातील कुडपण गावाजवळ पाथरी खिंडीमध्ये एका वळणावर लग्नाच्या वऱ्हाडाचा टेम्पाे सुमारे १५० फूट दरीत कोसळला. या भीषण अपघातामध्ये दाेघांचा मृत्यू झाला आहे, तर ६१ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लग्नसोहळा उरकून वरपक्ष नववधूला साताऱ्याहून खेड येथे घेऊन येत असताना हा अपघात घडला.

अपघातातील जखमींना महाड, पाेलादपूर येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झाला. सातारा जिल्ह्यातील कुमटे-काेंडाेशी येथून लग्नकार्य आटपून वऱ्हाड रत्नागिरी जिल्ह्यातील खेड-खवटी येथे परतत हाेते. पात्री खिंडीतून परतत असताना एका वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने अपघात घडल्याची शक्यता आहे. विठ्ठल बक्कु झोरे (६५, रा. खवटी ता. खेड), तुकाराम दत्तू झोरे (४०,रा. कावले, कुंभारडे ता. महाड), भावेश हरिश्चंद्र होगाडे (२३, रा. तुळशी धनगर वाडी) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.



घटनास्थळी पाेलादपूर पोलीस स्टेशनचे पाेलीस निरीक्षक प्रशांत जाधव, डीवायएसपी तांबे पोहोचले आहेत. महाड व खेड तसेच महाबळेश्वर येथील रेस्क्यू टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. महाड आणि पाेलादपूरमधील खासगी रुग्णालयातील डॉक्टर्स पाेलादपूर ग्रामीण रुग्णालयमध्ये हजर झाले आहेत. जखमींवर ताबडतोब उपचार सुरू आहेत, मात्र अपघात एवढा भीषण आहे की जखमींची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. 





Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर