महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय होणार २०० बेडचे
महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय होणार २०० बेडचे.
पनवेल : पनवेलचे महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय २०० बेडचे होणार आहे. रुग्णालयात आयसीयू चे ६ बेड तर डायलेसिसचे ४ बेड लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकुर यांनी २२ जानेवारी रोजी बोलावलेल्या बैठकीत देण्यात आली. पनवेलच्या महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयातील कामाच्या लवकर पूर्ततेसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी दुपारी सीकेटी महाविद्यालयात सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी ,रुग्णालयाचे अधिक्षक यांची संयुक्त बैठक बोलावली होती . या बैठकीला महापौर डॉक्टर कविता चौतमोल , नगरसेवक डॉक्टर अरूण भगत , सामाजिक कार्यकर्ते सतीश धारप , सार्वजनिक बांधकाम खात्याचे उप अभियंता भोई , कनिष्ट अभियंता किशोर जाधव, रायगड जिल्हा शल्यचिकित्सक सुहास माने, पनवेलच्या महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बसवराज लोहारे, प्रशासकीय अधिकारी सुभाष जाधव ,कार्यालयीन अधीक्षक पल्लवी सावंत उपस्थित होते यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या उप जिल्हा रुग्णालयातील विविध कामाचा आढावा घेतल्या नंतर पनवेल हे मुंबईच्या जवळ असलले वाढत्या लोकसंख्येचे महानगर असल्याने येथील नागरिकांच्या सोयीसाठी आयसीयूचे ६ बेड तर डायलेसिसचे ४ बेडचे काम १ महिन्यात पूर्ण करण्यास तसेच ऑक्सीजन टॅंकचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकार्याना दिले.याबरोबरच रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृहातील प्लास्टर व पीयूसीची कामे दुरुस्त करणे आणि फायर ऑडिट करून घेण्याचे आदेश दिले. पनवेल शहरा जवळून दोन महामार्ग गेले असल्याने या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांचे अपघात होत असतात त्यातील रुग्ण येथे उपचारासाठी आणले जातात त्यांना अनेक वेळा रक्ताची गरज असते यासाठी येथे ब्लड स्टोरेज आहे पण रक्त पेढी नाही. तसेच येथील रुग्णालय १२९ बेडचे आहे ते २०० बेड्चे करण्याचा आणि रक्त पेढीचा प्रस्ताव रायगड जिल्हा शल्यचिकित्सक सुहास माने यांना पाठवण्यास सांगितले.
Comments
Post a Comment