चौक ग्रामपंचायत दुर्गंधीमुक्त कधी होणार?
चौक : (आ. म ) ग्रुप ग्राम पंचायत चौक यांनी लावलेल्या सूचना फलकाच्या खालीच दुर्गंधीयुक्त कचरा असल्याने या फलकाचाच कचरा झाल्याची चर्चा या परिसरात सुरु आहे.ग्रामीण भागातील मोठी व ऐतिहासिक वारसा लाभलेली ग्रामपंचायत म्हणून चौक चा उल्लेख होत होता. या ग्रामपंचायत ला जिल्हा परिषद चे उपाध्यक्ष पद,सभापती पद,आमदार,स्वातंत्र्यसैनिक,भा.प्र.सेवा, सर नोबत नेताजी पालकर यांचे जन्मगांव,अशा मान्यवरांचे गांव म्हणून नाव लौकिक,थंड हवेचे ठिकाण माथेरानच्या जवळ,राष्ट्रीय महामार्ग ४ वरती वसलेले ह्या गावची ओळख बरच काही सांगून जाते.१० जून १९५१ रोजी ग्रुपग्राम पंचायत चौक ची स्थापना झाली.मात्र गेल्या ७० वर्षात येथील स्वच्छ्ता झाली नाही, ग्रामपंचायत वर अनेक भ्रष्टाचार चे आरोप आहेत,तुरतास है प्रकरण अर्ध न्यायिक असून विद्यमान ग्रामपंचायत वर मुदत संपल्याने प्रशाषकीय राजवट सुरु आहे.उत्पन्न साधन असूनही गतिमान ,कृतिशील व व्हिजन असलेल्या लोकप्रतिनिधि यांची वानवा असल्याने प्रगतिचे एक पाऊल मागेच पड़त आहे.स्वतःचे डंपिंगग्राउंड नसल्याने सुका व ओला कचरा याची विल्हेवाट लागली जात नाही, ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो,तिहि जागा पनवेल-कर्जत रेल्वे बाधिता ना घरे बांधन्यासाठी देण्याचे निश्चित झाले असल्याचे खात्रीपुर्वक समजते. तर बाजारपेठ मध्य मंडई नसल्याने भाजीपाला विक्रेता, चिकन,मटन,मच्छी विक्रेता, त्याच बरोबर मिठाई दुकानदार,किराणा व्यापारी हे आप ला सुका व ओला कचरा दुकानाच्या मागे, मोकळी जागा मिळेल तिथे टाकत असतात,त्याच्यावर डुकरे,कुत्री, कोम्बडया फिरत असतात.माझा गांव माझा विकास, माझे कुटुंब माझि जबाबदारी व कोरोना महामारीत काय कर्तव्य पार पड़ले हेही पहाने गरजेचे आहे.ग्राम पंचायत ची कचरा घंटा गाड़ी असुन अनेकजण,घरगुति व किराना दुकान,छोटे दुकानदार त्यात कचरा टाकतात,पण मिठाई,हॉटेल यांचा कचरा सतत पड़त असल्याने तेहि एकत्र करून ठेवत नसल्याचे दिसते,परिणामी हा कचरा राष्ट्रीय महामार्ग क्र.४ वर पडलेला या मार्गावरुन येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्यकाच्या नज़रेस स्वच्छताचा लावलेल्या बॅनरसह पडतो.आता लोकप्रतिनिधि नसल्याने ग्रामविकास अधिकारी व प्रशासक यांनी याबाबत योग्य ती कारवाई करून गंदगी मुक्त चौक ही घोषणा सिद्ध करावी अशी अपेक्षा नागरिक यांच्याकडून व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment