कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नातून ग्रामिण भागात विकासाचे महापर्व
कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नातून ग्रामिण भागात विकासाचे महापर्व
शहरांप्रमाणेच गावांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जात आहेत. गावे विकासाच्या दृष्टिकोनातून स्मार्ट झाली पाहिजेत या अनुषंगाने परेश ठाकूर यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. आज पनवेल महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यामध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती अ, ब आणि ड मधील गावातील विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. यावेळी उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृहनेते परेश ठाकूर, अतिरिक्त आयुक्त सांडभोर मॅडम, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बाल कल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती सभापती अनिता पाटील, समीर ठाकूर, हेमलता म्हात्रे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, हरेश केणी, बबन मुकादम, रामजी बेरा, माजी स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, आदी उपस्थित होते. तसेच इतर नगरसेवकांनी ऑनलाईन पद्धतीने या सभेत सहभाग घेतला. या सभेनंतर सभागृहनेते परेश ठाकूर व इतर मान्यवरांनी पत्रकारांशी संवाद साधून पनवेल महानगरपालिकेच्या विकासासाठी यापुढेही जास्तीत जास्त काम करण्याचे नमूद केले.
पनवेल महानगरपालिकेत २३ ग्रामपंचातीमधील गावांचा समावेश झाल्यानंतर या गावांचा शहराच्या धर्तीवर विकास करण्याच्या उद्दिष्टाने सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गावांना न्याय देण्याच्या संकल्प केला. त्यानुसार त्यांनी गावोगावी जाऊन ग्रामस्थांशी बैठका, भेटीगाठी घेऊन चर्चा केली. गावांना अपेक्षित काय आहे याची चाचपणी केली, त्यानुसार या गावांना विकासकामांची भेट त्यांनी आता प्रत्यक्षात दिली आहे.
महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती 'अ' मधील रोहिंजण गावातील जगन्नाथ पाटील ते शरद पाटील यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार बांधणे (रस्त्याच्या दोन्ही बाजूला) (रक्कम ३५ लाख ८९ हजार ४६० रुपये), रोहिंजण गावातील जगन्नाथ पाटील ते शरद पाटील यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम १९ लाख ५६ हजार ६६२ रुपये), रोहींजण गावातील मुख्य रस्ता ते स्मशानभूमीपर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम १५ लाख ०२ हजार ०३६ रुपये), तुर्भे गावातील भास्कर तरे ते जनार्दन पाटील यांच्या घरापर्यंत गटार बांधणे (रक्कम ११ लाख ८८ हजार २६५ रुपये), तुर्भे गावातील मोतीराम पाटील ते दिनकर पाटील यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम १० लाख ४३ हजार ९६७ रुपये), तुर्भे गावातील वसंत भोईर ते चांगा पिसर्वे यांच्या घरापर्यँत आरसीसी गटार बांधणे (रक्कम ४८ लाख ९४ हजार १०६ रुपये), तुर्भे गावातील चंद्रकांत भोईर ते बाबुराव पाटील घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम २१ लाख ५४ हजार ५३० रुपये), तुर्भे गावातील गजानन तरे ते संजय भोईर यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम ०७ लाख ७७ हजार ८९४ रुपये), धरणा कॅम्प गावातील साईनगर ते साईमंदिर पर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम १२ लाख २५ हजार ०६४ रुपये), धरणा कॅम्प गावातील मुख्य कमान ते उलवेकर यांच्या घरापर्यँत आरसीसी गटार बांधणे (रक्कम ३४ लाख ९४ हजार ९८७ रुपये), धरणा कॅम्प गावातील अंतर्गत गटारे बांधणे(रक्कम ०१ कोटी ३४ लाख१४ हजार ८३ रुपये), पापडीचापाडा गावातील विश्वनाथ घरत यांच्या घरापासून ते महानगपालिका शौचालयापर्यँत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम ०८ लाख १२ हजार ४५६ रुपये), पापडीचापाडा गावातील विश्वनाथ घरत यांच्या घरापासून ते महानगरपालिका शौचालयापर्यँत गटर बांधणे (रक्कम २४ लाख २२ हजार ८६६ रुपये), खुटुकबांधण येथील अंतर्गत गावातील रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम २४ लाख २२ हजार ८२७ रुपये),खुटारी गावातील एकनाथ म्हात्रे ते गोवर्धन म्हात्रे यांच्या घरापर्यँत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम ६४ लाख ३९ हजार ४२४ रुपये), खुटारी गावातील एनएच- ४ (कमानी पासून ) ते वासुदेव म्हात्रे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम २५ लाख ५४ हजार ५६९ रुपये), खुटारी गावातील चैतन्य मंदिर ते गणेश घाटपर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम ३७ लाख ६६ हजार ९६५ रुपये), एकटपाडा गावातील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम ३० लाख ६८ हजार ८८५ रुपये), एकटपाडा गावातील अंतर्गत गटार दुरुस्ती करणे (रक्कम ३५ लाख २७ हजार ५१९ रुपये), पडघे गावातील अनंत भोईर ते भाऊ पाटील यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम १२ लाख ६१ हजार २४६ रुपये), पडघे गावातील बालूराम भोईर ते कोडु भोईर यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम २५ लाख ३२ हजार ८४१ रुपये), पडघे गावातील नितीन भोईर ते संजय भोईर यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम १२ लाख ८८ हजार २०४ रुपये), किरवली गावातील मुख्य कमान ते पंप हाऊसपर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम ४५ लाख ६३ हजार २०१ रुपये), इनामपुरी गावातील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम २२ लाख २१ हजार ८०४ रुपये), तोंडरे गावातील राधाकृष्ण मंदिर ते नामदेव पाटील यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम ३० लाख ३९ हजार ५९४ रुपये), तोंडरे गावातील मुख्य रस्ता ते राधाकृष्ण मंदिर पर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम ०८ लाख ७६ हजार ९०२ रुपये), तोंडरे गावातील नाथा भरत पाटील ते नाथा बळीराम पाटील यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम २५ लाख ९४२ रुपये), तोंडरे गावातील मुख्य रस्ता ते लक्ष्मण पाटील यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम १३ लाख ७७ हजार ५२३ रुपये), तोंडरे गावातील राम मनोहर पाटील घर ते मुख्य रस्त्यापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम १४ लाख ४३ हजार ४७३ रुपये), नागझरी गावातील मुख्य रस्ता ते चाळ रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम २३ लाख ३५ हजार ४८४ रुपये), नागझरी गावातील मुख्य रस्ता ते काटेवाडी (माणिक काटे) रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम ६२ लाख २८ हजार ८२५ रुपये), कोपरा गावातील रस्ते काँक्रीटीकरण करणे (रक्कम ८७ लाख ९७ हजार ८९१ रुपये), कोपरा गावातील समाज मंदिराची डागडुजी करणे व सुशोभिकरण करणे (रक्कम २४ लाख ७५ हजार रुपये), ओवे गावातील अंतर्गत मुख्य रस्त्यालगत आरसीसी गटार बांधणे (रक्कम ९५ लाख ५२ हजार ७३१ रुपये), पेंधर येथील गोपाळ भंडारी ते हरिचंद्र निघूकर यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्ता करणे (रक्कम ०७ लाख ०२ हजार ४६७ रुपये), पेंधर येथील विठोबा रखुमाई मंदिर ते जानू नेरुळकर यांच्या घरापर्यंत रस्ता करणे (रक्कम ०६ लाख ०७ हजार ७५४ रुपये), विठोबा रखुमाई मंदिर ते जानू नेरुळकर यांच्या घरापर्यंत गटार करणे (०४ लाख ७८ हजार ६८८ रुपये)
पेंधर येथील जानू नेरुळकर ते गुरुनाथ पाटील यांच्या घरापर्यँत गटार बांधणे (रक्कम ०४ लाख ७८ हजार ६८८ रुपये), पेंधर येथील विठ्ठल मंदिर ते गावदेवी मंदिरापर्यंत रस्ता काँक्रीट करणे (रक्कम २७ लाख ११ हजार ५२३ रुपये), पेंधर येथील विठ्ठल मंदिर ते गावदेवी मंदिरापर्यंत आरसीसी गटार बांधणे (रक्कम ४७ लाख ६१ हजार ०३१ रुपये), पेंधर येथील हरिचंद्र निघूकर ते नितीन कोपरकर यांच्या घरापर्यंत गटार बनविणे (रक्कम ०४ लाख १३ हजार ४६३ रुपये), धरणा येथील प्रकाश कृष्णा पाटील ते श्रीपत पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे (रक्कम १० लाख १९ हजार ९६१ रुपये), धरणा येथील विकास केणी यांच्या घरापासून ते स्मशानभूमीपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे (रक्कम १३ लाख ०६ हजार ८०८ रुपये), धरणा येथील गावदेवी मंदिरापासून ते राजिप शाळेपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे (रक्कम १५ लाख ३८ हजार ४३७ रुपये), धरणा येथील काथोड मढवी ते उमेश पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे (रक्कम ०८ लाख ३६ हजार २७८ रुपये), धरणा येथील दिलीप पाटील ते नारायण मुंगा पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे (रक्कम ०५ लाख ९७ हजार ५२२ रुपये), राजिप शाळा धरणे येथे काँक्रीटीकरण करणे (रक्कम ०८ लाख १५ हजार २७३ रुपये), धरणा येथील हरेश पाटील ते नामदेव मढवी यांच्या घरापर्यंत गल्ली काँक्रीटीकरण करणे (रक्कम ०६ लाख ०९ हजार १२८ रुपये), धरणा येथील प्रकाश पाटील ते बळीराम मढवी यांच्या घरापर्यंत गटार बनविणे (रक्कम ०४ लाख ५३ हजार ४४६ रुपये), धरणा येथील कमलाकर केणी ते बाळाराम मळके यांच्या घरापर्यंत गटार बनविणे (रक्कम ११ लाख ९३ हजार ८९६ रुपये), पेठ गाव मधील अरुण खांदेकर ते संतोष शेळके यांच्या घरापर्यँत रस्ता बनविणे (रक्कम ०५ लाख ८८ हजार ९०७ रुपये), पेठगाव येथील रस्ता काँक्रीटीकरण करणे (रक्कम ०७ लाख २१ हजार २६३ रुपये), पेठगाव येथील सिव्हरेज लाईन आणि गटारे एकत्र असल्याने चेंबर दुरुस्ती करणे (रक्कम ०१ लाख ६८ हजार १५१ रुपये), तळोजा मजकूर येथील भरत राजे ते शंकर पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीट करणे (रक्कम ०७ लाख १८ हजार ९८१ रुपये), तळोजा मजकूर येथील भरत राजे ते शंकर पाटील यांच्या घरापर्यंत पाईप गटार बांधकाम करणे (रक्कम ०५ लाख ४२ हजार ०६३ रुपये), तळोजा मजकूर येथील रामदास पाटील यांच्या घराजवळील आरसीसी गटार बांधणे (रक्कम ०७ लाख ११ हजार २३६ रुपये), तळोजा मजकूर येथील रामदास पाटील यांच्या घराजवळील पाईप गटार बांधणे (रक्कम ०७ लाख ११ हजार ८३० रुपये), घोट गावातील राजेश गणपत पाटील ते संजय सिताराम कोळी ते मोहन निघूकर यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीट करणे (रक्कम ११ लाख ६८ हजार २६८ रुपये), घोट गावातील राजेश गणपत पाटील ते संजय सिताराम कोळी ते मोहन निघूकर यांच्या घरापर्यंत गटार करणे (रक्कम ०९ लाख ३०६ रुपये), घोट गावातील बुद्ध विहार ते ज्ञानेश्वर पाटील ते आत्माराम पाटील यांच्या चाळी पर्यंत काँक्रीट करणे (रक्कम ०९ लाख ८२ हजार ९७१ रुपये), घोट गावातील बुद्ध विहार ते ज्ञानेश्वर पाटील ते आत्माराम पाटील यांच्या चाळी पर्यंत गटार करणे (रक्कम १२ लाख ३४१ रुपये), घोट गावातील रत्नाकर जाधव ते कृष्णा निघूकर यांच्या घरापर्यँत नवीन भुयारी गटार करणे (रक्कम ०८ लाख ६१ हजार २०४ रुपये), धामोळे गाव येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे (रक्कम ११ लाख ८७ लाख ४४३ रुपये), प्रभाग समिती 'ब' मधील खिडूकपाडा येथील स्मशानभूमीमध्ये सुधारणा करणे (रक्कम २० लाख ८५ हजार ८१२ रुपये), खिडूकपाडा येथील अंतर्गत गटाराचे बांधकाम करणे (रक्कम ०१ कोटी १६ लाख ६२ हजार ९६९ रुपये), वळवली येथे समाजमंदिर बांधणे (रक्कम ६१ लाख ७१ हजार ३०७ रुपये), वळवली येथील स्मशानभूमीमध्ये सुधारणा करणे (रक्कम १९ लाख ९० हजार रुपये), वळवली येथील शंकर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम ११ लाख ०३ हजार २६० रुपये), वळवली येथील स्मशानभूमी ते दशरथ पाटील यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम १९ लाख २१ हजार ५२८ रुपये), वळवली येथील मारुती चिखलेकर ते मंगल भोईर ते बाळकृष्ण चिखलेकर ते गुरुनाथ चौधरी यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे (रक्कम १३ लाख ८४ हजार ७७१ रुपये), वळवली येथे हरी पेटकर ते सुभाष पाटील ते पांडुरंग भोईर ते दिनकर पालेकर ते सुनिल पालेकर ते स्वप्निल पालेकर, अरविंद पालेकर यांच्या घरापर्यँत गल्ली काँक्रीट करणे (रक्कम ०९ लाख ९९ हजार ७६६ रुपये), टेंभोडे येथील संदिप पाटील यांच्या घरापासून ते लक्ष्मण भोईर यांच्या चाळीपर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम १२ लाख ९२ हजार ८१७ रुपये), टेंभोडे गावामध्ये समाजमंदिर बांधणे (रक्कम ५० लाख ७३ हजार ५७० रुपये), टेंभोडे गावातील स्मशानभूमीमध्ये सुधारणा करणे (रक्कम ३० लाख रुपये), आसुडगाव मधील बौद्धवाडा येथे गटार बांधणे (रक्कम ५७ लाख ५२ हजार ०३ रुपये), आसुडगाव येथील कुणाल डेअरी ते दिनकर तांबडे घरापर्यंत रस्ता तयार करणे (रक्कम १० लाख ४७ हजार १५६ रुपये), आसुडगावमध्ये समाजमंदिर बांधणे (रक्कम ८७ लाख ३२ हजार ८८० रुपये), आसुडगावमध्ये अंतर्गत ड्रेनेज लाईन टाकणे (रक्कम ०१ कोटी ५५ लाख ०९ हजार ७२१ रुपये), कळंबोली गावातील स्मशानभूमी मध्ये सुधारणा करणे (रक्कम २८ लाख २६ हजार २९ रुपये), कळंबोली येथील सुनिल भगत ते संदिप भगत यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे (रक्कम ११ लाख ७९ हजार ५८ रुपये), कळंबोली येथील पाण्याच्या टाकीची सुरक्षा भिंत दुरुस्त करणे (रक्कम ०६ लाख ३१ हजार ९२७ रुपये), कळंबोली येथील नारायण जाधव चाळी पासून ते कातकरवाडी पर्यंत गटार बांधणे(रक्कम ०३ लाख ५३ हजार २३५ रुपये), कळंबोली येथील श्रीपद भगत चाळी पासून ते बैठक हॉल पर्यंत काँक्रीट रस्ता बनविणे (रक्कम ११ लाख ०६ हजार ३६ रुपये), प्रभाग समिती ब कार्यालयासमोरील जुनी व्यायाम शाळा तोडून त्या ठिकाणी नवीन व्यायामशाळा बांधकाम करणे (रक्कम ४७ लाख ९१ हजार ७०५ रुपये), कळंबोली येथील कातकरवाडी मधील अंतर्गत रस्ते व गटार दुरुस्ती करणे (रक्कम २१ लाख ७६ हजार ९६२ रुपये), कळंबोली येथील स्मशानभूमी ते शर्मा बेकरी पर्यंत रस्ता बनविणे (रक्कम २७ लाख ६९ हजार ६५४ रुपये), रोडपाली मधील बौद्धवाडी येथील कासाडी नदीलगत दगडाचे पिचिंग करणे (रक्कम ६१ लाख ३१० रुपये), प्रभाग समिती 'ड' मधील प्रभाग २० येथील पोदी भागांमध्ये मलनिःस्सारण वाहिन्या टाकणे (रक्कम ०१ कोटी ०९ लाख ३१ हजार ५७१ रुपये), पोदी भागांमध्ये अंतर्गत गटाराचे बांधकाम करणे (रक्कम ०१ कोटी ११ लाख ०५ हजार ५१ रुपये), प्रभाग २० मधील तक्का गाव येथे मलनिःस्सारण वाहिन्या टाकणे (रक्कम ०१ कोटी ३९ लाख ५४ हजार ८८७ रुपये), तक्का गावामध्ये अंतर्गत गटाराचे बांधकाम करणे रक्कम ०१ कोटी ३८ लाख ८४ हजार २८८ रुपये), प्रभाग २० मधील काळुंद्रे येथे मलनिःस्सारण वाहिन्या टाकणे (रक्कम ०१ कोटी ०४ लाख ०३ हजार १३६ रुपये), प्रभाग २० मधील भिंगारी गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गटाराचे बांधकाम करणे (रक्कम ०१ कोटी ०८ हजार रुपये) अशा जवळपास ३० कोटी रुपयांच्या विकासकामांना महासभेत मंजुरी मिळाली असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.
कोट-
महापालिका हद्दीतील सर्व परिसराचा विकास हाच उद्देश घेऊन काम सुरु आहे. शहरांप्रमाणेच गावांचा विकास झाला पाहिजे हा मुख्य उद्देश आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला आहे, त्यामुळे शहराच्या बरोबरीने गावांचा विकास होणार आहे. - महापौर डॉ. कविता चौतमोल
कोट-
पनवेलची महापालिका व्हावी यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रयत्न केले. काही लोकं कोर्टात गेली पण कोर्टानेही महापालिकेवर शिकामोर्तब केले. सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नाने आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची गंगा आली आहे. सभागृहनेते परेश ठाकूर यांनी गावांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आणि जबाबदारीने काम केले, त्यामुळे आज या गावांच्या विकासासाठी महत्वाचे पाऊल पडले. ३० कोटींची कामे ग्रामीण गावांमध्ये होणार आहेत त्याच अनुषंगाने या वर्षात जवळपास १२५ कोटी रुपयांची कामे करण्याचा मानस आमदार प्रशांत ठाकूर यांचा आहे. याकामी परेश ठाकूर यांच्यासमवेत महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त सुधाकर देशमुख व सहकाऱ्यांचे अभिनंदन व आभार मानतो.
"यापूर्वी हा गावे रायगड जिल्हा परिषदमध्ये होती. पण जिल्हा परिषदेच्या विकासाचा निधी अलिबाग, माणगाव, रोहा येथेच संपुष्टात यायचा त्यामुळे या गावांच्या विकासासाठी निधीची नेहमीच कमतरता राहिली, पण महानगरपालिकेमध्ये हि गावे समा
विष्ट झाल्यानंतर महानगरपालिकेने या गावांच्या विकासासाठी निधी देऊन गावांना मोठा दिलासा दिला आहे. "
विष्ट झाल्यानंतर महानगरपालिकेने या गावांच्या विकासासाठी निधी देऊन गावांना मोठा दिलासा दिला आहे. "
"शहरी भागासोबत ग्रामिण भागातील विकास झाला पाहिजे यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आम्हा लोकप्रतिनिधींवर जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे मी सभागृहनेता असलो तरी या विकासकामात महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त सुधाकर देशमुख, उपमहापौर जगदिश गायकवाड, नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, स्थायी समितीचे आजी माजी सभापती, प्रभाग समिती सभापती, सहकारी नगरसेवक यांचे योगदान आहे. "
Comments
Post a Comment