म्हसळा तालुक्यातील 39 ग्राम पंचायतीच्या आरक्षण सोडतीत 20 ठिकाणचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित.

 म्हसळा तालुक्यातील 39 ग्राम पंचायतीच्या आरक्षण सोडतीत 20 ठिकाणचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित.

म्हसळा -वार्ताहर

ग्राम पंचायत आरक्षण सोडत सन 2020 ते 2025 तालुका म्हसळा करिता 39 ग्राम पंचायतीचे आरक्षण सोडतीत अनुसुचित जाती एकुण जागा 2 पैकी एक जागा स्त्री करिता,अनुसुचित जमातीचे एकुण जागा 4 पैकी दोन जागा स्त्री करिता राखीव,नागरिकांचा मागास प्रवर्ग एकुण जागा 11 पैकी 6 स्त्री राखीव आणि सर्वसाधारण एकुण जागा 22 पैकी 11 अशा एकुण 20 ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पद  स्त्री करिता सोडत पध्दतीने आरक्षित झाले असल्याचे श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक प्राधिकृत अधिकारी अमित शेटगे यांनी जाहीर केले.म्हसळा तालुक्यातील एकुण 39 ग्रामपंचायतीत  

2011 मध्ये झालेल्या जनगणने नुसार अनुसुचित जातीच्या संख्ये नुसार आरक्षण सोडत होणार असल्याचे व आळीपाळीने आरक्षण देण्यात येणार असल्याचे सांगताना न्यु इंग्लिश स्कूल म्हसळा येथे आरक्षित करण्यात आलेल्या सोडतीत  इयत्ता 6 वी चा विध्यार्थी ओमप्रसाद सुर्यवंशी याचे हस्ते चिठ्ठी काढुन त्या - त्या ग्राम पंचायतीचे सरपंचपद आरक्षण जाहीर करण्यात आले. सुरुवातीला अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमातीचे आरक्षण घोषित करताना फळसल-अनुसुचित जाती(sc)आणि कोळवट-अनुसुचित जाती(sc)स्त्री करिता राखीव,खरसई-अनुसुचित जमाती- स्त्री राखीव,तोरडी-अनुसुचूचित जमाती-खुला,रेवळी-अनुसुचित जमाती -खुला,खामगाव-अनुसुचित जमाती-स्त्री राखीव आरक्षित करण्यात आले.नागरिकांचा मागासप्रवर्गा करिता देवघर - नामप्र-स्त्री राखीव

घुम-नामप्र-स्त्री राखीव,तुरुंबाडी-नामप्र स्त्री राखीव,साळवींडे-नामप्र,तोंडसुरे-नामप्र,निगडी-नामप्र-स्त्री राखीव,कुडगाव-नामप्र - खुला,पांगलोली-नामप्र-स्त्री राखीव,मांदाटणे-नामप्र,पाभरे-नामप्र,संदेरी-नामप्र-स्त्री करिता राखीव घोषित करण्यात आल्या स्त्रियांसाठी नामप्र मधून 

2005 ते 2015 पर्यंत आरक्षित होत्या एकूण 11 ग्राम पंचायतीचे आरक्षण काढायचे असल्याने आदी ज्या ग्रामपंचायती मध्ये 2005 ते 2015 पर्यंत नामप्र स्त्री साठी आरक्षित होत्या त्यातील पाभरे,वरवठणे,कांदळवाडा,लेप, आंबेत,संदेरी,आडीमहाड खाडी या 7 ग्राम पंचायती मधून दोन ग्राम पंचायतीचे आरक्षण सोडत पध्दतीने काढण्यात आले त्यातील  पाभरे व संदेरी या दोन ग्राम पंचायती चिट्ठीद्वारे नामप्र घोषित करण्यात आल्या.तालुक्यातील सर्वसाधारण जागेसाठी

खारगाव खुर्द ग्राम पंचायत,खारगाव बु.स्त्री राखीव,जांभुळ-सर्वसाधारण,नेवरूळ - स्त्री राखीव,केलटे-खुला,मेंदडी-खुला,गोंडघर-स्त्री राखीव,वारल-स्त्री राखीव,रोहिणी-खुला,वरवठणे-खुला कांदलवाडा,घोणसे- खुला,चिखळप-स्त्री राखीव,भेकऱ्याचा कोंड-खुला,काळसुरी-खुला,लेप-स्त्री राखीव,आंबेत-खुला,कणघर -स्त्री राखीव,ठाकरोली- स्त्री  राखीव,लिपणीवावे-स्त्री राखीव,कोळे -स्त्री राखीव,आडी महाड खाडी - स्त्री राखीव

जांभूळ,नेवरूळ-राखीव स्त्री असे पुढील कालावधीसाठी आरक्षण असणार असल्याचे सांगितले प्राधिकृत अधिकारी अमित शेटगे यांनी सरळ आणि सोप्या पद्धतीने आरक्षण करताना घोषित केले.या वेळी त्यांच्या मदतीला म्हसळा तहसीलदार के.टी.भिंगारे,महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.म्हसळा न्यु इंग्लिश स्कूलमध्ये काढण्यात आलेल्या ग्राम पंचायतीचे आरक्षण सोडतीसाठी तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर