Posts

Showing posts from December 29, 2020
Image
म्हसळा (रायगड) तालुक्यातील खरसई गावातील प्रितेश प्रभाकर माळी याने "वजीर सुळक्या"वर डौलाने तिरंगा फडकवला  म्हसळा (जितेंद्र नटे) :          सहयाद्री मध्ये गिर्यारोहण करणाऱ्या प्रत्येक गिर्यारोहकांच स्वप्न असणारा आणि महाराष्ट्रातील सर्वांत अवघड सुळक्यामधील एक समजला जाणारा सुळका, उंच उंच टेकड्या, घनदाट जंगल आणि त्यांच्या मधोमध 90 अंशातील सरळ सुळका. कोणाच्याही अंगावर शहारे येतील अशीच ही जागा आहे. ठाणे जिल्ह्यात शहापुरच्या माहुली किल्ला परिसरातील हा सुळका ज्याला वजीर सुळका या नावाने ओळखल जात. ही जागा पाहूनच जिथं सर्वसामान्यांचा काळजाचा ठोका चुकतो. तिथं या वजीर सुळक्याची चढाई करणं याची कल्पनाही करणं अशक्य. मात्र ते धाडस म्हसळा (रायगड) तालुक्यातील खरसई गावातील युवक प्रितेश प्रभाकर माळी याने करून वजीर सुळक्यावर डौलाने तिरंगा फडकवला असून ही खरसईच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.           निसरडी गवताळ पाऊल वाट, 90 अंश उभी आणि 280 फूट उंच अशी अतिकठिण चढाई. सुळक्याच्या पूर्वेस जवळ जवळ 600 फूट खोल दरी आणि पाण्याची प्रचंड कमतरता. त्यामुळे या सुळक्यावर चढाई करायचे ठरवले आणि चुकून पाय निसटला त
Image
समाज भान राखून ठेवला आदर्श! लतिफ शेख यांचा वाढदिवस शांततेत साजरा पनवेल (प्रतिनिधी) :  नेता म्हटला की कार्यकर्ते आले,वाढदिवस आला,धामधुम,दणका आलाच, पण सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक लतीफ शेख यांची बातच निराळी. कोरोनात समाजासाठी झोकून देणाऱ्या या समाज सेवकाचा वाढदिवस नुकताच साजरा झाला तो शांततेच्या कोलाहलात.उत्साही कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर केवळ केक कापून कोणताच डामडौल न करता या नेत्याने त्याचे समाजभान दाखवून दिले.एक प्रकारे त्यांनी एक आदर्शच समाजासमोर ठेवला आहे.         गुरुवार दि 24 डिसेंबर ला लतीफ शेख यांचा वाढदिवस. तो दणक्यात साजरा करण्याची तयारी करूनच त्यांचे कार्यकर्ते प्रभाग क्रमांक 14 मधील मुस्लिम मोहल्ल्यात  पोचलेही. मात्र कोरोनाने आज अनेक घरांची वाताहात केली आहे, अनेकांचे रोजगार गेलेत, कितीतरी बळी या महामारीने घेतलेत अशावेळेस मी माझा वाढदिवस साजरा करून त्यांच्या दु:खाला नजरेआड करू शकत नाही, माझे मन त्याला परवानगी देत नाही असे सांगत त्यांनीच कार्यकर्त्यांना समजवले.या काळात जेवढी करता आली ती मदत केली पण ती खूप कमी आहे त्यामुळेच हा सोहळा नको अशी भुमिका त्यांनी घेतली.         
Image
• भावाला हळद लावून परतणारी बहिण  अपघातात ठार,पती गंभीर  या अपघाताचे वृत्त कळताच - पत्रकार सय्यद अकबर धावले! • खांदा कॉलनीनजीक मध्यरात्री भिषण अपघात  • वाहनचालक फरार  पोलिसात गुन्हा दाखल पनवेल दि: 27 ( प्रतिनिधी ) भावाच्या लग्नासाठी अंधेरीहून पनवेलला आलेल्या बहिणीला भरधाव गाडीने उडवले. पनवेल खांदा कॉलनीनजीक शंकर मंदिराजवळच झालेल्या या भिषण अपघातात हळदी कार्यक्रम आवरून परतणारी बहिण सोनल राहूल जाधव जागीच मरण पावल्या तर त्यांचे पती गंभीर जखमी झाले. 26 डिसेंबरला पहाटे 12:30 च्या दरम्यान हा अपघात झाला. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असून पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या दुर्देवी घटनेमुळे रोडपाली बौद्धवाडीवर  शोककळा पसरली असून शोकाकुल अवस्थेतच भावाला त्याचे लग्न केवळ उपचार म्हणून उरकावे लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.        रोडपाली बौद्धवाडी येथील अनुराग गायकवाड यांचे 27 डिसेंबरला आज लग्न होते.  त्यासाठीच त्यांची बहिण सोनल आणि तिचे पती राहूल अंधेरीहून येथे आले होते. 25 ला रात्री उशिरापर्यंत हळद कार्यक्रम रोडपाली बौद्धवाडीत झाला .तो आवरून सोनल आणि राहूल त्यांच्या स्कुटी

• अवघ्या चार तासात कामोठेत खुलेआम गोळीबार करणारे जेरबंद! • हाॅटेल देशी ढाबा मध्ये अकरा जणांच्या टोळक्याचा राडा ,दोन जखमी • डॅशिंग पोलीस ऑफिसर संजय पाटील यांच्या दणक्याने गुंडाविश्वाला हादरा!

Image
•  अवघ्या चार तासात कामोठेत  खुलेआम गोळीबार करणारे जेरबंद! •  हाॅटेल देशी ढाबा मध्ये अकरा जणांच्या टोळक्याचा राडा ,दोन जखमी •  डॅशिंग पोलीस ऑफिसर संजय पाटील यांच्या दणक्याने गुंडाविश्वाला हादरा! पनवेल दि: 28 डिसेंबर (प्रतिनिधी) नाताळच्या निमित्त सर्वत्र धुमधमाल सुरू असतानाच कामोठेत 26 डिसेंबरला रात्री थरारक प्रकार घडला. मद्यप्राशन करताना झालेल्या किरकोळ वादाचा भडका उडाला, अकरा जणांच्या टोळक्याने जबरदस्त हाणामारी करत खुलेआम गोळीबार केला.यात दोघे जखमी झाले असून त्यांच्याकडून गाड्या व मोबाईलसह लाखोंचा मालही लुटून हे टोळके फरार झाले या घटनेची फिर्याद दाखल होताच कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी डॅशिंग कारवाई करत फक्त चारच तासात यापैकी सात गुंडाना जेरबंद करत मुद्देमालही हस्तगत केला. पाटील यांच्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून कामोठे आणि परिसरातील गुंडाविश्व मात्र जबरदस्त हादरले आहे.      कामोठेतील प्रसिद्ध अशा हाॅटेल देशी ढाबा मध्ये 26 डिसेंबरला रात्री 9:30 च्या सुमारास मयुर बबन जाधव (27) आणि त्याचा भाऊ योगेश (29) रा. कळंबोली, नवी मुंबई  हे आपल्या मित्रां

• म्हसळा श्रीवर्धन रोडवरील सकलप गावानजीक बसला अपघात • पोलिसांनी दाखवला प्रसंगावधान, पहाटे 5 वाजता जाऊन वाचविले 30 प्रवाश्यांचे प्राण

Image
https://www.youtube.com/watch?v=nro7DucnFSE  • म्हसळा श्रीवर्धन रोडवरील सकलप गावानजीक बसला अपघात  • पोलिसांनी दाखव ला  प्रसंगावधान, पहाटे 5 वाजता जाऊन वाचविले 30 प्रवाश्यांचे प्राण म्हसळा / जितेंद्र नटे           म्हसळा श्रीवर्धन रोडवरील सकलप गावच्या वरती म्हसळा पोलीस ठाणे हद्दीत हद्दीत मुंबई- दादर हून श्रीवर्धन बाजूकडे जाणारी ट्रॅव्हलर्स ला जबरी अपघात झाला. याविषयी अधिक माहिती देतांना म्हसळा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहायक पोलिस निरीक्षक धनंजय पोरे यांनी सांगितले की, बस क्रमांक MH48K1005 ही चालक नदीर अली हाफीजऊल्लाह खान, वय वर्षे 41, राहणार गोडवा कैशोला प्रतापगड उत्तरप्रदेश सध्या राहणार जय हनुमान नगर, दादर, मुंबई. हा बस घेऊन 05:00 वाजण्याच्या सुमारास सकलप रोडवरून श्रीवर्धनकडे जात असताना त्याला झोप आल्याने त्याचा बस वरील ताबा सुटून बस रस्त्याचे बाजूला जाऊन बस कलंडली व अपघात घडला. सदर बस मध्ये एकूण 30 प्रवाशी होते. सदर अपघातात 9 प्रवाशी किरकोळ जखमी असून सदर अपघाताचे घटनास्थळी जाऊन म्हसळा पोलिसांनी तात्काळ बस मधील प्रवाश्यांना उपचाराकरिता म्हसळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. सदर अपघ