Posts

Showing posts from December 25, 2020

• श्रीवर्धन येथे महिलेला शिवीगाळ आणि दमदाटी - नागरिकांमध्ये संताप • श्रीवर्धन येथे महिला सुरक्षित कि असुरक्षित ? • आमदार - पालकमंत्रीहि महिला आहेत, महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष घालतील अशी अपेक्षा!

Image
• श्रीवर्धन येथे महिलेला शिवीगाळ आणि दमदाटी - नागरिकांमध्ये संताप • श्रीवर्धन येथे महिला सुरक्षित कि असुरक्षित ? • आमदार - पालकमंत्रीहि महिला आहेत, महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष घालतील अशी अपेक्षा! श्रीवर्धन (जितेंद्र नटे / सोपान निंबरे) :       श्रीवर्धन पोलीस स्टेशनच्या हद्दीत रोज नवनवीन प्रकार घडत असतात. अश्यातच दिनांक २२-१२-२०२० रोजी एका महिलेला शिवीगाळ आणि मारण्याच्या धमकीचा प्रकार घडला. या घटनेची सविस्तर माहिती देताना श्रीवर्धन येथील महिला रहिवाशी अनिता प्रदीप गौतम ह्या सांगत होत्या कि, "रस्त्यावरून चालत जात, असताना महेश सायगावकर या इसमाने मला शिवीगाळ केली तसेच गैरशब्दही वापरले आणि जीवे मारण्याची धमकीही दिली"      या संधर्भात श्रीवर्धन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बाबर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि, हे दोन्हीही व्यक्ती  एकमेकांच्या ओळखीचे आहेत. यांचा आपापसात अगोदरपासूनच वाद आहेत. त्यांच्यामध्ये मागील भांडणाचा राग मनात ठेवून महेश सायगावकर याने त्यांना शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली असे म्हणणे महिला तक्रारदार श्रीमती अनिता प्रदीप गौतम् यां
Image
 • कोळवट गावच्या रहिवाशी कै. विजया विजय खेडेकर यांच्या आकस्मिक जाण्याने नागरिकांनी व्यक्त केली हळहळ   • सहवास जरी सुटला स्मृती सुगंध देत राहील, आयुष्याचा प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल.   • दिनांक २६-१२-२०२० वार शनिवार रोजी त्यांचे दहावे कार्य श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथे होणार आहेत आणि बारावे  विधी कार्य २८-१२-२०२० रोजी मु. कोळवट येथे होणार आहेत.  म्हसळा (जितेंद्र नटे) :        मायेची सावली म्हणून ओळख असणाऱ्या, सर्वांच्या सुख दुःखाला धावून जाणाऱ्या कोळवट गावच्या रहिवाशी कै. विजया विजय खेडेकर यांच्या अचानक जाण्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दिनांक १७/१२/२०२० रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. गेली अनेक वर्षे कष्ट करून कुटुंब वाढवलेल्या विजया यांच्या अचानक जाण्याने कुटुंबियांच्या जीवाला चटका लागून राहिला आहे. पण काळ वेळ हि आपल्या हातात नसते. त्यांच्या पाठीमागे त्यांचे पती विजय खेडेकर आहेत आणि तीन मुलं आहेत. धार्मिक कामात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. पती विजय यांच्या कार्यात त्यांच्या पत्नीची हि मोठी साथ होती. आज हि साथ अधुरी राहिली. सहवास जरी सुटला स्मृती सुगंध देत राहील, आयुष्याचा प्रत्य
हवा प्रदूषणामुळे मॉर्निंग  वॉक तुमच्या आरोग्यासाठी ठरू शकतो घातक ! खारघर-तळोजा-पनवेलसाठी वातावरण  एअर क्वालिटी मॉनिटरींग रिपोर्ट  तुम्ही जर खारघर-तळोजा-पनवेल पट्ट्यातील रहिवासी असाल तर तुमचे मॉर्निंग वॉक तुम्हाला फायदेशीर ठरण्याऐवजी नुकसान करणारे ठरू शकतात, असं निरीक्षण वातावरण या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने सुमारे महिनाभर हवेच्या गुणवत्तेचा आढावा घेतल्यानंतर नोंदवलं आहे. या अभ्यासाअंती समोर आलेल्या माहितीनुसार सकाळी सहा ते आठ या वेळेत पीएम २.५ (पार्टिक्युलेट मॅटर पोल्युटंट) कणांची पातळी खूप जास्त नोंदली गेली आहे. दरम्यान या पट्ट्यातील हवेच्या गुणवत्तेशी संबंधित आकडेवारीनुसार गेल्या महिन्याभरात पनवेल प्रदूषित हवेच्या दिवसांना सामोरं गेलं आहे. त्यापैकी जवळपास सर्व दिवसांत हवेच्या प्रदूषणानं धोक्याची पातळी ओलांडली होती. आरोग्य क्षेत्रातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार पार्टिक्युलेट मॅटर पोल्युटंट्स, विशेषतः पीएम २.५ खूप सूक्ष्म असतात आणि सहज फुप्फुसांत प्रवेश मिळवून श्वसनाशी संबंधित आजारांना कारण ठरतात. पीएम. २.५ ची उच्च पातळी कमी दृश्यमानता आणि धुरकं याचंही कारण ठरते. या अभ्या
Image
 श्रीवर्धन-शिवसेना नेते, माजी केंद्रीयमंत्री मा.श्री. अनंत गीते यांच्या प्रयत्नांतून  दांडगुरी येथे श्री. गणेश विसर्जन घाटाचे शानदार भुमिपूजन सोहळा  श्रीवर्धन (मंगेश निंबरे)          शिवसेना मा.आमदार श्री. तुकाराम सुर्वे श्रीवर्धन पंचायत समिती सभापती श्री. बाबुराव चोरगे  श्रीवर्धन शिवसेना तालुकाप्रमुख श्री.प्रतोषभाई कोलथरकर,शिवसेना श्रीवर्धन तालुक्यातील शिवसेनीक आणि ग्रुप ग्रामपंचायत दांडगुरीचे सरपंच श्री.गजानन पाटील  उपसरपंच श्री. दत्तात्रेय पांढरकामे, तसेच ग्रुप ग्रामपंचायत सदस्य श्री.वंसत कदम सौ. जयश्री धांदरुत.सौ. प्रगती इंदुलकर शिवसेना युवासेना श्रीवर्धन उपतालुका प्रमुख श्री.ओमकार शेलार .शिवसेना. विभागप्रमुख श्री. राजेश करंदेकर शिवसेना विभाग प्रमुख श्री. गजानन कदम.वाकलघर ग्रुप ग्रामपंचायत सरपंच श्री. अनंत गुजर वावेपंचतन शिवसेना शाखाप्रमुख श्री.शरद महाडिक. दांडगुरी पोलिस पाटील सौ. गाईत्री शेलार दांडगुरी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष श्री. अशोक सावंत.सेक्रेटरी श्री. दशरथ पवार. दांडगुरी ग्रामसेवा मंडळ-मुंबई सेक्रेटरी श्री. शरद जाधव क्षत्रिय मराठा समाज मुंबई अध्यक्ष.श्री. किशोर राऊत.सेक्रेटरी
Image
 देशाचे माजी पंतप्रधान व भाजपचे ज्येष्ठ नेते श्रद्धेय स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनी पनवेल भाजपा जनसंपर्क कार्यालयात अटलजींच्या काव्यपंक्तीचे पोस्टर लावण्यात आले असून हे पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.  तसेच सोशल मिडीयावर देखील चांगलेच व्हायरल आणि कौतुक होत आहे. अटलजींच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ‘अटल करंडक’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे सन २०१५ पासून पनवेलमध्ये भव्यदिव्य आयोजन करण्यात येते. परंतु या वर्षी कोरोना काळात स्पर्धेचे आयोजन जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे.