
युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन श्रीवर्धन प्रतिनिधी :राजू रिकामे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या 80 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत युवक राष्ट्रवादी काँग्रेसने आज श्रीवर्धन नगरपरिषद शाळा नं 1 मध्ये रक्तदानाचे आयोजन केले. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन, वडवली, श्रीवर्धन शहर या विविध भागातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी रक्तदानात सहभाग नोंदवला. अलिबाग रक्तसंकलन केंद्राने डॉ. गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्त पिशव्याचे संकलन केले. शहर त्याच सोबत तालुक्यातील विविध भागात राष्ट्रवादीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. नगरपरिषद शाळा क्र. 1 मध्ये आयोजित रक्तदान शिबिर प्रसंगी पक्षाच्या वतीने उपस्थित कार्यकर्त्यांसाठी शरद पवार यांच्या जीवनावरती आधारित विविध चित्रफिती दाखवण्यात आल्या. शरद पवार यांनी आपल्या आयुष्यात राजकीय सामाजिक शैक्षणिक या सर्व क्षेत्रांमध्ये केलेल्या कामगिरीची माहितीचे प्रदर्शन करण्यात आले. सदर प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोहम्मद मेमन यांनी सांगितलं शरद पवार हे संपूर्ण द...