
• मित्रांसाठी दिलीप - समाजामध्ये समाजसेवक दिलीप कांबळे - राजकारणामध्ये दिलीपजी कांबळे साहेब .... आज आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच होत आहेत... निवृत्त्त • कुठे थांबले पाहिजे हे ज्याला कळले, त्याला जगण्याचा मार्ग कळला. • दिलीप कांबळे यांना रायगड जिल्ह्यातील मानाचा समजला जाणारा "रायगड मत भूषण पुरस्कार" जाहीर म्हसळा / जितेंद्र नटे (रायगड मत) म्हसळ्यात आज चर्चिली जाणारी बातमी एकच होती - ती म्हणजे दिलीप कांबळे यांची राजकारणातून निवृत्ती. मला आठवतय १९९४ साली दिलीप कांबळे हा संजीवनी पतपेढीसाठी काम करीत असे. तेव्हा मी १० वीला होतो. नवीन शाळेतून खाली उतरलो कि, कधी दिलीप कांबळे एक तरुण हा बसलेला असायचा. मला काही त्यावेळी शिक्षणाशिवाय काही कळत नव्हते. मात्र समाजाचे सर्व कार्यक्रम दिलीप कांबळे हाताळायचे हे माहित होते. तिथून तो सुहास महागावकर म्हणजे आमचे दादा जेष्ठ समाजसेवक यांना फोन करायचा आणि पुढील कार्यक्रम आखायचा. मित्रानो त्यावेळी फोन म्हणजे खूप मोठी गोष्ट. मी हि तिथे कुतुहूल म्हणून जात असे. दिलीप दादा अनेक गोष्टी सांगत असे. मी त्याला दादा म्हणत असे पण तो द...