Posts

Showing posts from December 7, 2020

म्हसळा बंद; बंद म्हणजे बंद - महेश जाधव

Image
म्हसळा बंद; बंद म्हणजे बंद - महेश जाधव          म्हसळा व्यापारी असोशियन, हॉटेल असोशियन, रिक्षा चालक मालक संघटना, सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, इतर छोटे मोठे दुकानदार यांना आवाहन. म्हसळा (रायगड मत) : उद्या भारत बंध आहे ,केंद्राच्या कृषी विरोधी बिलाच्या विरोधात आणि पंजाब हरियाणा येथील शेतकऱ्यांना सपोर्ट म्हणून कृपया या बंध मधे सामील व्हा. अशी हाक अध्यक्ष बहुजन क्रांती मोर्चा, म्हसळा तालुका संयोजक महेश जाधव यांनी मारली आहे. शेतकरी हा आपला अन्नदाता आहेच पण ग्राहक पण तोच आहे , शेतकऱ्यांची मुले बॉर्डरवर जवान म्हणून सीमेचे रक्षण करत आहेत, त्यांचीच मुले विविध कंपनी मध्ये कामगार आहेत. त्यांना सपोर्ट म्हणून उद्या म्हसळा बंद मध्ये सहभागी व्हा असे थेट आवाहन म्हसल्याचे तरुण तडफादर उभारते नेतृत्व महेश जाधव यांनी व्यक्त केले. काय कळत बिला मधील ? काय समजत कायद्याचं ? असे प्रश्न विचरणाऱ्यांना सांगा कायद्याचं कळत नाही पण फायद्याचं कळत ...ज्यांच्या साठी कायदा बनवता त्यांना विचारले पाहिजे? शेतकऱ्यांचे म्हणणे, मागण्या, समस्या जाणून घेऊन सर्व समावेशक चर्चा संसद आणि विविध नुज चैनल वर घडून आणली पाहिजे. आध

लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व प्रियंका पालंट हाऊस वतीने महापरिवर्तन दिनानिमित्त तुळसी वाटप व कँन्डल मार्चचे आयोजन

Image
लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व प्रियंका पालंट हाऊस वतीने महापरिवर्तन दिनानिमित्त तुळसी वाटप व कँन्डल मार्चचे आयोजन  नवी मुंबई प्रतिनिधी  लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व प्रियंका पालंट हाऊस यांच्या संयुक्त वतीने महापरिवर्तन दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, बोधिसत्व, भारतरत्न प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन निमित्त तुळसी वाटप व कँन्डल मार्चचे आयोजन सिउड एल & टी समोर सेक्टर २८ येथे करण्यात आले होते यावेळी जवळ पास  १०० हुन अधिक जणांनी कँन्डल लाऊन आदरांजली देण्यात आली.  तुळसी वाटप व काँडल मार्च आयोजन रविवार  रात्री ०८ ते ०९  या दरम्यान  आयोजित केले होते  या प्रसंगी लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे, प्रियंका पांलट हाऊस चे मालक विक्की वांडे, नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस गुरुनाथ नाईक, जयश्री फांऊंडेशन चे अध्यक्ष वैभव जाधव मैत्री ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष अक्षय काळे व इतर मान्यवर  व ग्रुपच्या सदस्यनी उपस्थिती दर्शविली.

विभागीय कार्यशाळा रामवाडी पेण येथे महामानवाला विनम्र अभिवादन

Image
विभागीय कार्यशाळा रामवाडी पेण येथे महामानवाला विनम्र अभिवादन श्रीवर्धन: भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रामवाडी विभागीय कार्यशाळा येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले व सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आली या वेळी यंत्र अभियंता मा श्री माने साहेब यांनी आपल्या मनोगतात सांगितले की बाबासाहेबांनी आपल्याला ‘शिका आणि संघटीत व्हा’ संघर्ष करा अशी शिकवण दिली. समाजातील प्रत्येक व्यक्तीला मान, सन्मान, न्याय, व्यक्ती-अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मतदानाचा हक्क व समानतेची वागणूक देणारी राज्यघटना दिली. डॉ. बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना व राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचं संरक्षण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे.           तर उपयंत्र अभियंता मा  श्री जुनेदी एम बी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की भारतीय राज्यघटनेचे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचे नामकरण भारत असे केले तर प्रत्येक नागिकस भारतीय ही ओळख दिली डॉ बाबासाह

श्रीवर्धन शहराची ग्रामदैवता श्री सोमजाई देवी मंदिराचा जीर्णोद्धार व भक्त निवास भूमी पूजन सोहळा संपन्न

Image
श्रीवर्धन शहराची ग्रामदैवता श्री सोमजाई देवी मंदिराचा जीर्णोद्धार व भक्त निवास भूमी पूजन सोहळा संपन्न     श्रीवर्धन / सोपान निंबरे        श्रीवर्धन शहराची ग्रामदैवता श्री सोमजाई देवी मंदिराचा जीर्णोद्धार महाराष्ट्र शासन तीर्थशेत्र विकास योजनेअंतर्गत रायगड जिल्हा कार्यसम्राट खासदार सुनीलजी तटकरे यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आला होता. त्याच बरोबर भक्त निवास बांधकाम भूमिपूजन सोहळा शनिवार ५डिसेंबर २०२० रोजी राज्यमंत्री पर्यटन महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री रायगड जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली  रायगड जिल्हा लोकसभा खासदार सुनील जी तटकरे यांच्या शुभ हस्ते विधान परिषद आमदार अनिकेत  तटकरे तसेच श्रीवर्धन तालुका अध्यक्ष दर्शन विचारे , नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक सोमजाई देवी ट्रस्टचे अध्यक्ष , उपाध्यक्ष, सेक्रेटरी, पुजारी, पदाधिकारी यांच्या  प्रमुख उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडला यावेळी आपल्या ग्रामदैवतेवर मनोभावे श्रध्दा असणारे भाविक तसेच श्रीवर्धन वासीय उपस्थित होते.

स्थानिक पत्रकार संघटनेची स्थापना 

Image
स्थानिक पत्रकार संघटनेची स्थापना  स्थानिक पत्रकार संघटनेची स्थापना  श्रीवर्धन (सोपान निंबरे)            अनेक वर्षांपासून दक्षिण रायगडमध्ये अनेक पत्रकार एकत्र काम करत आहेत. यातूनच स्थानिक पत्रकारांना एक हक्काचे व्यासपीठ असावे असा विचार डोकावू लागला. यातूनच आज 6 डिसेंबर बाबासाहेबांच्या महापरिर्वाण दिनाचे औचित्य साधून श्रीवर्धन येथे स्थानिक पत्रकारांनी मिळून एक स्थानिक पत्रकार संघटनेची स्थापना केली. आपले प्रश्न सोडविण्यासाठी शिकले पाहजे, संघर्ष केले पाहिजे, जनतेला जागृत केले पाहिजे. बाबासाहेबांचा हा मूळ मंत्र घेऊन स्थानिक लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्यासाठी स्थानिक पत्रकार नेहमीच अग्रेसर असतात. मात्र ते नेहमीच उपेक्षित राहतात. आपल्या तालुक्यातील जनतेच्या समस्या ते मोठ्या तळमळीने मांडत असतात. अशा पत्रकारांना मात्र नेहमीच अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असते. याच साठी "रायगड मत"चे संपादक जितेंद्र नटे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगाव विशेष करून दक्षिण रायगड जिल्ह्यातील स्थानिक पत्रकारांची ही एकमेव संघटना निर्माण करण्यात आली आहे. ये

श्रीवर्धन ग्रुप ग्रा. दिघीमध्ये ग्रामसेवक मधुकर भालदार याने  केला ७० लाखांचा भ्रष्टाचार # विस्तार अधिकारी यांनी केलेल्या दप्तर तपासणीत झाले उघड ;  ग्रामसेवक भालदारला तीन वेळा निलंबित करण्यात आले होते

Image
श्रीवर्धन ग्रुप ग्रा. दिघीमध्ये ग्रामसेवक मधुकर भालदार याने  केला ७० लाखांचा भ्रष्टाचार # विस्तार अधिकारी यांनी केलेल्या दप्तर तपासणीत झाले उघड ;  ग्रामसेवक भालदारला तीन वेळा निलंबित करण्यात आले होते श्रीवर्धन\सोपान निंबरे  श्रीवर्धन दिघी ग्रुप ग्रामपंचायत उप सरपंच गीता भद्रसेन वाढई यांनी ग्रामसेवक भालदार यांनी ग्रामपंचायत मध्ये केलेला गैरव्यवहाराबद्दल बोलताना सांगितले  ग्रुप ग्रामपंचायत दिघीमध्ये ग्रामसेवकांकडून भ्रष्टाचाराची  योजना आखली आहे. अस म्हणायला हरकत नाही.  २८ जाने २०१४ ला पं. स. श्रीवर्धन कडून दिघी ग्रा.पंचायतीची दप्तर तपासणी केली असता ग्रामसेवक बि. बि.घनमोडे याने २०११ वर्षी १८ दिवसाच्या कालावधीत रु ६ लाख ५० हजाराची अपहार, ग्रा.वि. अधिकारी एस एस श्रीवर्धनकर यानी२०११ ते २०१४ या कालावधीत ६१ लाख ९३ हजाराची अफहार, तर ग्रामसेवक एम एच भालदार यांनी २०१४ ते २०१५ या कालावधीत १३ लाख ७२ हजार रुपयांची अपहार केल्याचे उघड झाले आहे.   याआधीही  ग्रामसेवक मधुकर हरी भालदार यांना तीन वेळा निलंबित करण्यात आले होते असे असतांना यांनी पदाचा दुरुपयोग करून १४ वित्त आयोगाच्या निविदा उघडणे प्रक्रिया क