प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्याचं पाहिजेत - बबनदादा पाटील
प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्याचं पाहिजेत - बबनदादा पाटील भिंगारीसह कामोठे आणि टेंभोडेतील प्रकल्पग्रस्तांशी साधला संवाद स्व. दि.बा.पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या ६ व्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : राज भंडारी गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित करून घेण्यासाठी केलेल्या ४० वर्षांच्या लढ्याला आता खऱ्या अर्थाने ठाकरे सरकारच्या माध्यमातून यश मिळण्यास सुरुवात झाली आहे. स्व. दि.बा.पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या मार्फत हा पाठपुरावा केल्यानंतर आता शासनामार्फत सर्व्हे करून निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी गरजेपोटी बांधलेल्या बांधकामांचा होणारा सर्व्हे हा शेतकऱ्यांच्या, प्रकल्पग्रस्तांच्या हिताचा आहे हे समजण्यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून गावोगावी या बैठका घेवून शेतकरी तसेच प्रकल्पग्रस्तांना सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. सिडकोला आज ५० वर्षे पूर्ण होवून गेली, मात्र १९७० साली सिडको आली त्याच्या अगोदर म्हणजेच जवळपास १९४० च्या आसपासचा असलेला सर्व्हे त्यांनी रेकॉर्डवर घेवून काम सुरू केले. मुळातच ३० वर्षांचा फरक आणि आता त्या सर्व्हेनुसार