Posts

Showing posts from November 14, 2020

सर्वात मोठी बातमी - राज्यातील धार्मिक स्थळांचे दरवाजे अखेर खुले होणार # शिस्तीचे पालन केले, त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही

Image
जनतेच्या भावना लक्षात घेऊन सर्व धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय  मुंबई: पाडव्यापासून म्हणजेच सोमवार दि. १६ नोव्हेंबरपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. राज्यातील धार्मिक स्थळांचे दरवाजे अखेर खुले होणार आहेत.  'दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासूर वधही झाला. नरकासूररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर करोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच', असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे सुरू करण्याची घोषणा करताना नमूद क

म्हसळा पोलीस सतर्क पोलीस, जनतेमध्ये पोलिसांबद्दल वाढला आदर  # सहाय्य्क पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली -  पोलीस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण आणि सहकाऱ्यांना अनेक गुन्हेगारांना पकडण्यात यश

Image
म्हसळा पोलीस सतर्क पोलीस, जनतेमध्ये पोलिसांबद्दल वाढला आदर  सहाय्य्क पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली -  पोलीस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण आणि सहकाऱ्यांना अनेक गुन्हेगारांना पकडण्यात यश म्हसळा (जितेंद्र नटे) @raigadmat.page       म्हसळा तालुक्यात काही ठिकाणी चोर आणि काही गुन्हेगारांनी काही दिवसापूर्वी धुमाकूळ घातला होता. मात्र या लबाड चोरांना आळा घालण्यात म्हसळा पोलीस सदैव उजवे राहिलेले आहेत. चोर कितीही शातिर असला तरी तो काही तरी पुरावा सोडतोच. हिच बाब हेरून म्हसळा पोलीस स्टेशनचे "सतर्क पोलीस" कॉन्स्टेबल संतोष चव्हाण यांनी आपलं बुध्दिकौशल्याचा वापर करीत तंत्रज्ञानाचा वापर करून म्हसळ्यात ज्या घरफोड्या झाल्या होत्या त्या चोरांना बेडया  ठोकल्या होत्या. तसेच ५९ लाख रुपयांच्या दरोडा प्रकरणातील काही गुन्हेगार म्हसळा येथे दबा धरून बसले होते, त्यांच्याही मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. अशा अनेक गुन्हेगारांना पकडण्यात संतोष चव्हाण हे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचे सहकारी सूर्यकांत जाधव, विजय फोफसे, संदीप फोंडे, मल्हारी तोरमले हे यशस्व