Posts

Showing posts from November 12, 2020

हभप निवृत्ती महाराज देशमुख यांना संत तुकडोजी महाराज समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

Image
रसायनी, राकेश खराडे   चौक वावर्लें येथील कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक दिपक पाटील यांच्यावतीने सामाजिक प्रबोधन करणारे ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांच्या अकोले इंदुरी येथील निवासस्थानी जाऊन त्यांना कानसा वारणा फाउंडेशनच्यावतीने  संस्थापक दिपक पाटील यांच्याहस्ते संत तुकडोजी महाराज समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेली उद्योजक निलेश घरत, फाउंडेशनचे पुणे जिल्हा ध्यक्ष सिध्दार्थ जाधव, अभिजित खेबडे,अनिकेत तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते.       ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख यांनी किर्तंनातून समाजप्रबोधन करुन माणुसकीचे दर्शन घडविण्याचे महान कार्य त्यांच्या हातून घडत आहे.त्यांच्या कार्यांची प्रशंसा करावी तेवढी कमीच असल्याने हभप निवृत्ती महाराज देशमुख यांना कानसा वारणा फाउंडेशनच्यावतीने संत तुकडोजी महाराज समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे संस्थापक दिपक पाटील यांनी सांगितले.

बोर्लेतील शेतकऱ्यांना बियाणांचे‌ वाटप

Image
  रसायनी, राकेश खराडे         भातपड क्षेत्रावर रब्बी हंगाम‌ हरभरा बियाणे लागवड (टिआरएफए) कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप करण्यात आले.यावेली पंचायत समिती माजी उपसभापती वसंत काठावले,कृषी अधिकारी आय.डी.चौधरी, प्रगतशिल शेतकरी गोविंद पाटील,फार्मंर रिसोर्स बॅंकेचे सदस्य व शेतकरी बांधव उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन कृषी पर्यंवेक्षक ढवल यांनी केले होते.      रब्बी हंगामात शेतकऱ्यांना आपल्या जमिनीतून विविध बियाणांची लागवड करुन पिक घेता यावे यासाठी टिआरएफ ए कार्यंक्रमाअंतर्गंत त्यांना बियाण्यांचे वाटप केल्याचे माजी उपसभापती वसंत पांडुरंग काठावले यांनी बोलताना सांगितले.    

शिवकार्य ट्रेकर्सच्यावतीने किल्ले  स्वच्छता मोहीम

Image
  रसायनी : राकेश खराडे           शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील किल्यांवर  गडकोटांचं रक्षण व्हावं या हेतूने, खालापूर तालुक्यातील  शिवकार्य ट्रेकर्सच्यावतीने किल्ले विसापूर येथे दुर्गभ्रमण करीत असताना किल्ले स्वच्छता  मोहीम राबविण्यात आली.        या मोहिमेत प्लॅस्टिक, बाटल्या व अविघटनशिल कचरा गोळा करण्यात आला. कड्याकपारीत, झाडाझुडपात जाऊन कचरा गोळा करण्यात आला. गडावर येणाऱ्या पर्यटकांकडुन पाणी तसेच थंड पेयाच्या बाटल्या गड परिसरात टाकून दिल्या जातात. या सर्व वस्तू गोळा करण्यात आल्या. या मोहिमेत दोन बॅगा प्लॅस्टिक व थर्माकोल सदृश अविघटनशील कचरा गोळा करून तो गडाच्या पायथ्याशी असलेल्या कचरा पेटीत आणण्यात आला. पर्यावरण रक्षण व्हावे, ऎतिहासिक वास्तुचे जतन व्हावे या भावनेने ही मोहीम राबवण्यात आली. शिवकार्य ट्रेकर्सचे संस्थापक रोहिदास ठोंबरे सर व त्यांचे सहकारी यांच्या मार्गदर्शनाने मोहीम राबवण्यात आली होती.                  आतापर्यंत अशी मोहीम महाराष्ट्रातील अनेक गडकिल्यांवर राबवली असून दुर्गसंवर्धन व स्वच्छता या विषयावर जनजागृती करण्यात आली आहे.अभियान राबवण्यात आलेले आह