बिहारमध्ये शिवसेनेला नोटापेक्षा कमी मते - भाजप नेते अतुल भातखळकर
मुंबईः बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट होऊ लागले आहे. सध्या येत असलेल्या कलानुसार एनडीएनं जोरदार मुसंडी मारलेली आहे. शिवसेनेनं देखील बिहारमध्ये २२ जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, बिहार निवडणुकीत शिवसेनेल अपेक्षित यश मिळू शकलेलं नाहीये. यावरूनच महाराष्ट्र भाजपनं शिवसेनेवर निशाणा साधला आहे. बिहारमध्ये तीन टप्प्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासूनच सुरु आहे. बिहारच्या निवडणुकीत शिवसेनेनंही जागा लढवण्याचा निर्णय घेतला होता. पण या निवडणूकीत शिवसेनेला नोटापेक्षा कमी मते मिळाली आहे. यावरुनच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. 'बिहारमध्ये सोनिया सेनेला नोटापेक्षा कमी मते मिळाली. निवडणूक चिन्ह म्हणून बिस्किटच बरे होते विनाकारण तुतारीची लाज काढली,' असा खोचक टोला भातखळकर यांनी लगावला आहे. बिहार निवडणुकीत शिवसेनेला ०.०५ टक्के मत मिळाली आहेत तर अनेक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झालं आहे. विशेष म्हणजे नोटाला १. ७४ टक्के मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसला ०. २३ टक्के मते मिळाली आहेत. दुपारी ती