क्युआर कोड स्कॅन करून फसवणूक करणाऱ्या टोळीला अहमदनगर पोलिसांनी केले गजांआड
नगर ( प्रतिनिधी) नगर-सोलापूर रोडवर सिद्धी पेट्रोल पंप येथे ८ नोव्हेंबरला एका कारमधून चार जण आले. त्यांनी या कारमध्ये तीन हजार रुपयांचे पेट्रोल भरले. तसेच ऑनलाइन पेमेंट करतो, असे सांगून पेट्रोल पंपावरील क्युआर कोड स्कॅन केला. त्यानंतर ऑनलाइन पेमेंट झाल्याचा मेसेज पेट्रोल पंपावर असणाऱ्या व्यवस्थापकाला दाखवला. त्यानंतर हे चौघे भरधाव कारमधून निघून गेले. पेट्रोल पंपावरील व्यवस्थापक प्रमोद खरे यांनी पेट्रोल पंपाचे खाते चेक केले असता, तीन हजार रुपये जमा झाले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संबंधित कारमधील व्यक्तीने खोटा एसएमएस दाखवून फसवणूक केल्याचे लक्षात येताच, व्यवस्थापक खरे यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एखाद्या दुकानात जाऊन वस्तूची खरेदी करायची. त्यानंतर ऑनलाइन पेमेंट करतो, असे सांगून दुकानात लावण्यात आलेला क्युआर कोड स्कॅन करायचा व एका अँड्रॉइड ॲपचा वापर करत ऑनलाइन पेमेंट केल्याचा खोटा एसएमएस पाठवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीचा नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी