म्हसळ्यात कदम फर्निचरला रात्री २ वाजता लागली आग ### आग विझवण्यासाठी म्हसळा नगरपंचायत कडे काहीही व्यवस्था नाही?
म्हसळा तालुक्यात कदम फर्निचर ला रात्री २ वाजता लागली आग आग विझवण्यासाठी म्हसळा नगरपंचायत कडे काही(ही) व्यवस्था नाही. लवकरच या विषयी जनआंदोलन छेडण्यासाठी स्थानिक जनता एकत्र येऊन आंदोलन छेडणार आहेत असे समजते आहे. या साठी लवकरच "स्थानिक संरक्षण संघटने"ची स्थापना करु या अशी भावना "रायगड मत" कडे अनेक स्थानिक लोकांनी बोलून दाखवत आहेत आणि त्याचे नेतृत्व "रायगड मत" ने करावे अशी काही लोकांनी इच्छा व्यक्त केली. म्हसळा (प्रतिनिधी) @ रायगड मत म्हसळा दिघी रोड येथे कदम फर्निचर म्हणून दुकान आहे. लाकडापासून अनेक वस्तूं तयार करण्याचे एकमेव ठिकाण आहे. मात्र रात्री अचानक २ वाजता धूर येताना दिसू लागले. लागलीच येथील तै बा कॅटरर्स चे मालक श्री. नईम दळवी धावून गेले. त्यांच्या सॊबत इर्शाद भाई तांबे, जुनेद खान, शरीफ काका बाबु खान, सोनू अली फोऊझन दामाद, आसिफ अली, कॉन्स्टेबल आर जी राठोड, वि के सुंदर आणि खराटे हेही मदतीला धावून आले. या सर्व लोकांनी मदत करून ताबडतोब आग भडकण्यापासून वाचवली मात्र त्याअगोदरच लाकडी बरेच वस्तू जळुन खाक झाल्या होत्या. वरील मदतगार आग रोखावयास रात्री