Posts

Showing posts from November 3, 2020

• ये तो सिर्फ झांकी हैं, पिक्चर अभी बाकी हैं - अशा घोषणा देत ओबीसी समाजाचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा  • भाजप शहराध्यक्ष मंगेश मुंडे आणि भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर यांच्या घोषणांनी म्हसळा दणाणले. • आमच्या आरक्षणाला हात लावाल तर रस्त्यावर उतरू - महादेव पाटील शिवसेना तालुका अध्यक्षांचा सरकारला इशारा

Image
• ये तो सिर्फ झांकी हैं, पिक्चर अभी बाकी हैं - अशा घोषणा देत ओबीसी समाजाचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा   • भाजप शहराध्यक्ष मंगेश मुंडे आणि भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर यांच्या घोषणांनी म्हसळा दणाणले. • आमच्या आरक्षणाला हात लावाल तर रस्त्यावर उतरू - महादेव पाटील शिवसेना तालुका अध्यक्षांचा सरकारला इशारा म्हसळा (जितेंद्र नटे) @raigadmt.page         म्हसळा समाजाचा आज ओबीसी आरक्षण बचावासाठी जबरदस्त धडक मोर्चा निघाला. तालुक्यातील ओबीसी संघर्ष समन्वय समितीचा आज संघर्षमय मोर्चा पाहायला मिळाला. आपल्या प्रमुख मागण्यासहित अनेक कार्यकर्ते पण ठराविक कार्यकर्त्यांनी म्हसळा तहसीलदार कार्यालयाला धडक दिली. आपल्या प्रमुख मागण्या सरकार कडे मागत जबरदस्त असे एल्गार उभे केले. या मोर्चा चे वैशिष्ट्ये म्हणजे सर्व पक्षाचे नेते पदाधिकारी सामील झाले होते. राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य बबन मनवे, शिव सेना तालुका अध्यक्ष महादेव पाटील, भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर, शहराध्यक्ष मंगेश मुंडे, राष्ट्रवादीच्या रेश्मा कानसे, भाजपचे गणेश बोर्ले, ओबीसी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष बबन भिकाजी उंडरे, राजाराम पाटील, संद

विधानपरिषदेसाठी शिवसेनेत मतभेद

Image
मुंबई :           महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यात झालेल्या संघर्षानंतर राज्यपाल या नावांना पसंती देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे आणि धनगर समाजाचे नेते यशपाल भिंगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तर काँग्रेसकडून रजनीताई पाटील, सचिन सावंत, मुजफ्फर हुसेन, आणि गायक अनिरुद्ध वनकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.            विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांच्याकडे सोपवणार आहे. राज्यपाल महाविकास आघाडी सरकारच्या नावांना मंजुरी देणार की, आडकाठी करणार यावर सर्वांचं लक्ष आहे. मात्र राज्यपाल कुठल्या निकषांवर आणि घटनात्मक तरतुदींवर बोट ठेवून सरकारची कोंडी करु शकतात यावर लक्ष असेल. यासाठी सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. आतापर्यंत अंतिम झालेल्या नावांची यादी विधी व न्याय विभागाकडे छाननीसाठी पाठवण्यात आली आहे. जेणेकरुन राज

खडसेंचे नाव पुन्हा अडचणीत? , राज्यपालांकडे तक्रार

Image
मुंबई :  विधानपरिषदेसाठी साठी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवणार आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपाला रामराम करून पक्षात आलेले एकनाथ खडसे यांचे नाव निश्चित मानले जात आहे. मात्र खडसेंचे नाव पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन खडसेंच्या नावावर आक्षेप घेतला आहे. अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की,, त्यात त्या म्हणाल्या की, प्रसारमाध्यमात राज्यपाल नियुक्तीसाठी १२ नावं झळकत आहेत, त्यातलं एक नाव एकनाथ खडसे आहे. मात्र खडसेंचे नाव येणं हे संतापजनक आहे, राष्ट्रवादी भ्रष्टाचारी नेत्याला पुन्हा राजकारणात राष्ट्रवादीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्याविरोधात निवेदन देण्यासाठी मी राज्यपालांची भेट घेतली. भ्रष्टाचाराविरोधातील लढ्याला खडसेंसारखे नेते पुन्हा राजकारणात आले आणि सक्रीय झाले तर काहीच अर्थ राहणार नाही, त्यामुळे माझे निवेदन आणि कागदपत्रे राज्यपालांना दिली आहेत. तसेच एकनाथ खडसे जे भाषा वापरतात त्याबद्दल मी राज्यप

मुंर्बत दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट ?

Image
मुंबई :           मुंबईला पुढील महिन्यात कोरोनाचा मोठ धोका असून मे किंवा सप्टेंबरसारखी रुग्णांमध्ये वाढ दिसून येईल असे टाट इन्स्टिट्यूने म्हटले आहे.           ऑक्टोबर 26 च्या माहितीवरून टीआएफआरच्या टीमने हा निष्कर्ष काढला आहे. शहरात कमी अधिक प्रमाणात 80 टक्के झोपडपट्टी आणि 55 टक्के अन्य रहिवांमध्ये हर्ड इम्युनिटी जानेवारी 2021 पर्यंत होण्याची शक्यता आहे. मुंबईतील तीन वॉर्डमध्ये कोरोना संक्रमित झालेल्या रुग्णांचा अभ्यास करण्यता आला. यावरून गणपतीनंतर जशी कोरोनावाढीची लाट आली तशी दिवाळीनंतर कोरोनाची सुसरी लाट येण्याचा धोका आहे. ही लाट मागील लाटेपेक्षा छोटीही असू शकते, असे टीआयएफआरचे प्राचार्य डॉ. संदीप जुनेजा यांनी सांगितले. याचे मुख्य कारण म्हणजे गणपतीत अधिकाधिक मुंबईकर कोरोनामुळे धोक्यात होते. यामुळे त्यांच्या कमी अधिक प्रमाणात प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. यामुळे ही लाट थोडीफार छोटी असेल, असे ते म्हणाले.