Posts

Showing posts from November 2, 2020

निलेश मांदाडकर म्हणजे आदर्श समाजसेवक  सरपंच असून सुद्धा समाजासाठी रात्रंदिवस हजर....  संत निरंकारी मंडळाच्या संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन साठी केले रक्तदान.... 

Image
निलेश मांदाडकर म्हणजे आदर्श समाजसेवक सरपंच असून सुद्धा समाजासाठी रात्रंदिवस हजर.... संत निरंकारी मंडळाच्या संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन साठी केले रक्तदान....  म्हसळा (खरसई) / हेमंत पयेर          संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या वतीने रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण असे अनेक समाजउपयोगी कार्य करण्यात येत असतात. त्याचाच एक भाग म्हणून हे रक्तदान शिबिर संपन्न झाले        निरंकारी मंडळाच्या संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने श्रीवर्धन व म्हसळा सेक्टर मार्फत आपात्कालिन रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. रविवार  सकाळी 11 ते 2 या वेळेत खरसई येथील संत निरंकरी सत्संग भवन येथे शिबिराचे आयोजन केले होते.        याप्रसंगी कोविड - 19 ची परिस्थिती लक्षात घेता सदर शिबिरात जास्तित जास्त रक्तदात्यांनी उपस्थित होते. तसेच मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवुन प्रत्येकाने व्यवस्थेला सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सनिटायजरचा वापर करत गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन रायगड झोन (40 अ) चे झोनल इंचार्ज प. आ. महात्मा प्रकाशजी म्हात्रे यांनी केले. निलेश मांदाडकर म्हणजे आदर्श समा

मी होतो तेव्हा शिवसेना होती. म्हसळा तालुक्यात शिवसेना मार्गदर्शन मेळाव्याचा बार फुसका, म्हसळयात शिवसेना संपली, तटकरेनी ती संपवली - कृष्णा कोबनाक • सत्तेत नसतानाही मी कामे करीत आहे. एकदा आमदार होऊ द्या मग दाखवतो माझी ताकद - कृष्णा कोबनाक 

Image
• मी होतो तेव्हा शिवसेना होती. म्हसळा तालुक्यात शिवसेना मार्गदर्शन मेळाव्याचा बार फुसका, म्हसळयात शिवसेना संपली, तटकरेनी ती संपवली - कृष्णा कोबनाक • सत्तेत नसतानाही मी कामे करीत आहे. एकदा आमदार होऊ द्या मग दाखवतो माझी  ताकद  - कृष्णा कोबनाक  म्हसळा (प्रतिनिधी) @raigadmat.page        म्हसळा तालुक्यात शिवसेना मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता तो अतिशय अल्प पदाधिकारी यांच्या समवेत. राज्यात सरकार असून ही शिवसैनिक निराश. राज्यात सत्ता मिळावी म्हणून एकत्रित व मतदारसंघात एकला चला रे? काय ही अवस्था. महा विकास आघाडी सरकार हे जनतेच्या भल्या साठी स्थापन झाले नसून सर्व भ्रष्टाचारी नेते एकत्रित येऊन आपली प्रकरणेही भविष्यात बाहेर येऊ नयेत म्हणून राजकीय आश्रय घेण्यासाठी एकत्र आले आहेत. अशा प्रदेश कार्यकारिणी सदस्य कृष्णा कोबनाक यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. शिवसेने कडून विकास कामांची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. विकासच विसरले आहेत ते, हे सरकार फार काळ टिकणार नाही, लवकरच आप आपसात भांडणे करुन पडणार आहे. स्वार्थासाठी भारतीय जनता पार्टी सोबत म्हणजे आमच्या पक्षा सोबत फारकत घेऊन राज्यात अनै

टायर फुटल्याने गाडीला अपघात; एकनाथ खडसे सर्व सुरक्षित

Image
जळगाव ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या गाडीला अंमळनेरहून जळगावकडे येताना धरणगावजवळ अपघात झाला. स्वतः खडसे यांनी आपल्या ट्विटरवरून ही दिली. खडसे यांनी लिहिले – आज अंमळनेरहून जळगावकडे येताना धरणगावजवळ माझ्या गाडीला किरकोळ अपघात झाला. गाडीचा वेग कमी असल्याने व चालकाच्या प्रसंगावधाने, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व सुखरूप आहोत. कोणालाही इजा झालेली नाही. खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर त्यांना पक्षातर्फे विधानपरिषदेची उमेदवारी व मंत्रिपद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. टीव्हीच्या एका वृत्तवाहिनीच्या बातमीत म्हटले आहे की, खडसे यांच्या गाडीचे टायर फुटल्याने हा अपघात झाला.