Posts

Showing posts from November 1, 2020

मोदी सरकारला जीएसटीतून 1 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला

Image
नवी दिल्ली (प्रतिनिधी)             ऑक्टोबर केंद्राला जीएसटीच्या माध्यमातून 1 लाख कोटी रुयांपेक्षा अधिक महसूल मिळाला आहे. गेल्या आठ महिन्यांत प्रथमच केंद्राला जीएसटीच्या माध्यमातून 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल प्राप्त झाला आहे. ऑक्टोबरमध्ये केंद्राला 1 लाख 5 हजार 155 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. यामध्ये सीजीएसटीमधून मिळालेल्या 19 हजार 193 कोटी, एसजीसीटीमधून मिळालेल्या 52 हजार 540 कोटी आणि आयजीएसटीमधून मिळालेल्या 23 हजार 274 कोटी रुपयांचा समावेश आहे. तर सेसच्या माध्यमातून सरकारला 8 हजार 11 कोटी रुपये मिळाले आहेत.            कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी मार्चमध्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. कोरोनाचा फैलाव होउ नये म्हणून प्रवास, उद्योगधंद्यांवर निर्बंध लादण्यात आले याचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला. उद्योगधंदेच ठप्प झाल्यानं केंद्राला मिळणार्‍या महसुलात प्रचंड मोठी घट झाली. त्यामुळे राज्यांना मिळणारा जीएसटीतील हिश्श्याची भरपाई करणं सरकारसाठी अवघड झालं. मात्र आता केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.   जीएसटी भरपाईसाठी 1.1 लाख कोटींचे कर्जः केंद्र स

खडसे यांची विधानपरिषदेची आमदारकीची संधी धोक्यात ?

Image
मुंबई :          भाजपा सोडून एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांची राष्ट्रवादीतर्फे राज्यपाल नामनिर्देशित आमदार म्हणून विधान परिषदेवर वर्णी लागण्याची चर्चा आहे. त्यांचे नाव आमदारकीसाठी निश्चित मानले जात आहे. मात्र, दमानिया यांच्या तक्रारीमुळे वांधा होण्याची शक्यता आहे.         एकनाथ खडसे भ्रष्टाचारी आहेत; त्यांना आमदार करू नका, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया  यांनी राज्यपालांना केली आहे. यामुळे खडसे यांची विधानपरिषदेची आमदारकीची संधी धोक्यात येण्याची शक्यता आहे.         खडसेंनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला व याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात खडसेंविरूद्ध तक्रार दाखल केली आहे, असे सांगितले.        खडसे यांच्याविरुद्ध राज्यपालांना दिलेल्या निवेदनात दमानिया यांनी म्हटले आहे की, खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना माझ्याबाबत वापरलेली भाषा या सर्व गोष्टींमुळे त्यांना आमदार नियुक्त करू नका. पवारांनी केला खडसेंना वाचवण्याचा प्रयत्न !          माध्यमांशी बोलतान

काश्मीरात तिरंगा फडकेल का?; संजय राऊतांचा मोदी सरकारला सवाल

Image
मुंबई :            काश्मीरमध्ये तिरंगा फडकू देणार नसल्याचं विधान पीडीपीच्या अध्यक्षा मेबबूबा मुफ्तींनी केलं. त्यानंतर श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अटकदेखील झाली. गृह मंत्रालयानं एक अधिसूचना प्रसिद्ध करत देशाच्या कोणत्याही भागातील व्यक्तीला काश्मीरमध्ये जमीन खरेदीची परवानगी दिली. 370 कलमाचा निचरा करूनही कश्मीरचा प्रश्न संपला नाही. कश्मीरात आता बाहेरच्यांनाही जमीन खरेदी करता येईल असे सरकारी आदेश आले; पण श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यावर आजही बंदी आहे. मग ते जमिनीचे तुकडे घेऊन काय करायचे?, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. कश्मीरची समस्या कायमचीच संपायला हवी. अयोध्येतील राममंदिराचा प्रश्न मार्गी लागला. तसा कश्मीरचा प्रश्नही संपावा, अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केला आहे. संजय राऊतांचा ‘रोखठोक’ : मोदी हे दुसऱ्या वेळेस पंतप्रधान झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात अमित शहा गृहमंत्री म्हणून बसले. त्यांनी एक काम केले. ते म्हणजे कश्मीरातील 370 कलम उडवून लावले. ’35 अ’ कलम संपवले. लडाखला जम्मू-कश्मीरपासून तोडून स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश केला. या घटनेस एक वर्

ओएनजीसी महामार्गावरील खड्डे सुरक्षा रक्षकांनी बुजविले

Image
पनवेल : राज भंडारी           पनवेल शहरालगत जाणाऱ्या मुंबई पुणे - गोवा महामार्गावरील ओएनजीसी येथील सिग्नल जवळील रस्त्यावर पडलेले खड्डे संबंधित विभागाला दिसून येत नसल्यामुळे अखेर शनिवारी येथील ओएनजीसी कंपनीच्या गेटवरील सुरक्षा रक्षकांनी हे खड्डे स्वकर्तुत्वाने भरून काढले आहेत.           मुबई पुणे - गोवा जुना हायवे लगत  ओएनजीसी  गेट सिग्नल जवळ खुप मोठे खड्डे पडले होते, त्यामध्ये बाईक स्वार खुप मोठ्या प्रमाणात पडून जखमी होत होते तसेच महिला लहान मुलांना गाडीवर घेउन दुचाकीस्वार पडले आहेत. शनिवारी सकाळी एक बाईक सवार पडला व त्याच्या चेहऱ्यावर तसेच डोक्याला मार लागला आहे. सदर घटनेचे गांभीर्य पाहता येथील सामाजिक कार्यकर्ते बाळाराम चिखलेकर आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षक बळ  ओएनजीसी गेट यांच्या साहाय्याने सदरचे खड्डे  बुजवण्यात आले. सदरचे खड्डे बुजवण्यात आल्यामुळे वाहन चालकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले असून ओएनजीसी सुरक्षा रक्षकांचे आभार मानण्यात आले. 

धाडसी अधिकारी शत्रुघ्न माळी खारघर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पदी रुजू

Image
  पनवेल : राज भंडारी                धाडसी पोलीस अधिकारी शत्रुघ्न माळी यांची खारघर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आपल्या पदाचा पदभार शनिवारी सकाळी स्वीकारला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी आपल्याकडील पोलीस ठाण्याच्या पदभार शत्रुघ्न माळी यांच्याकडे सुपूर्द केला.              शत्रुघ्न माळी हे पोलीस अधिकारी म्हणून सर्वांना परिचित आहेत, पनवेल शहर पोलिस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक म्हणून काम करताना त्यांनी अनेक धाडसी कारवाया करून गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण केली होती.  यावेळी खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनधिकृत धंदे वाल्यांचे धाबे यामुळे धबकले आहेत.  पोलीस अधिकारी असले तरी त्यांनी आपल्या शैलीने अनेक मित्र परिवार जोडला आहे. मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून समजसेवक तसेच पत्रकार त्यांच्याकडे पाहत असतात. शनिवारी त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर असंख्य समाजसेवक, राजकीय नेते, पत्रकार मंडळींनी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या आहेत.