Posts

Showing posts from October 31, 2020

नावे सध्या गुलदस्त्यात;  पवार-ठाकरे यांचं काय ठरलं?

Image
मुंबई,          विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची वर्णी लागणार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रत्येकी चार जणांना संधी मिळणार आहे. ही नावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत चर्चेअंती निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही नावे सोमवारी राज्यपालांकडे पाठवली जाणार असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. यात शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर आणि आदेश बांदेकर ही दोन नावे जवळपास निश्चित मानली जात आहेत तर राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांना संधी मिळेल, अशी दाट शक्यता आहे. ही नावे सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, राज्यपाल नियुक्त सदस्य हा कला, साहित्य, समाजसेवा आणि सहकार या क्षेत्रातील असावा असा दंडक आहे. या निकषावर आपण निश्चित केलेले उमेदवार उजवे ठरावे व राज्यपालांकडून त्यावर कोणतीही हरकत घेतली जाऊ नये, हा प्रयत्न तिन्ही पक्षांचा आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यकारभार चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेले शरद पवार मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीला गेल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.        राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कोणाकोणाची