Posts

Showing posts from October 29, 2020

जाहिरात : गृहप्रवेश (घरभरणी) कार्यक्रम : - मु. तोंडसुरे, ता. म्हसळा, जिल्हा - रायगड, आमच्या नवीन घराचे गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित केले आहे तरी आपणा सर्वाना हार्दिक निमंत्रण - रवी धर्मा भायदे (शुभेच्छुक : एकता आवाज फाउंडेशन)

Image
जाहिरात : गृहप्रवेश (घरभरणी) कार्यक्रम :  - मु. तोंडसुरे, ता. म्हसळा, जिल्हा - रायगड, आमच्या नवीन घराचे गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित केले आहे तरी आपणा  सर्वाना हार्दिक निमंत्रण  - रवी  धर्मा भायदे (शुभेच्छुक : एकता आवाज फाउंडेशन)

टीआरपी घोटाळ्यातील मासा पोलिसांच्या जाळ्यात

Image
मुंबई (प्रतिनिधी)         पैसे देऊन टीआरपी वाढवून देण्याच्या घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने याआधी दहा जणांना अटक केली असून यातील अभिषेक कोलावडे या आरोपीच्या चौकशीत आशीष चौधरी याचे नाव पुढे आले. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. क्रिस्टल ब्रॉडकास्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या कामकाजाचा आवाका देशभरात असल्याने विशेष पथके तयार करण्यात आली. याची कुणकुण लागताच आशीषने बुधवारी पोलिसांपुढे शरणागती पत्करली.         टीआरपी घोटाळ्यात ग्राहक आणि वाहिन्या यांच्यामधील आर्थिक देवाणघेवाणीतील प्रमुख दुवा असलेला मोठा मासा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. मुंबई पोलिसांची पथके देशभरात फिरत असल्याचे लक्षात येताच क्रिस्टल ब्रॉडकास्ट प्रायव्हेट लिमिटेड या केबल डिस्ट्रिब्युशन कंपनीचा मालक आशीष चौधरी बुधवारी पोलिसांना शरण आला. आशीष हा हंसा कंपनीच्या अटकेत असलेल्या माजी कर्मचाऱ्यांना ग्राहकांना वाटण्यासाठी पैसे पुरवत होता. त्याच्या अटकेमुळे या घोटाळ्यातील अटक आरोपींची संख्या ११वर पोहोचली आहे.      ...

लोकलसाठी खासगी कर्मचाऱ्यांना वाट पाहावी लागणार

Image
      मुंबई (प्रतिनिधी)                अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सुरू केल्यानंतर रेल्वे आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी यांच्यात गर्दी नियंत्रणासाठी बैठक पार पडली. या बैठकीत कार्यालयीन वेळेत बदल आणि रंगावर आधारित क्यूआर पास यंत्रणा, असे उपाय राबवण्यावर सविस्तर चर्चा पार पडली. सर्व महिलांसाठी लोकलमुभा दिल्यानंतर झालेल्या बैठकीत याच मुद्द्यांचा पुनरुच्चार झाला. उपायाशिवाय सर्वांना लोकल प्रवासाची मुभा दिल्यानंतर गर्दी वाढेल. यामुळे नियंत्रणात आलेला करोनाचा पुन्हा वेगाने पसरण्याची भीती आहे. उपाय केल्यानंतर सर्वांसाठी लोकल प्रवासाची मुभा असावी, यावर बैठकीत उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एकमत झाले होते, असे बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.            खासगी कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्यांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. करोना संसर्गाची भीती कायम असल्याने रोगाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी 'आधी गर्दी नियंत्रणासाठी उपाय, मग प्रवासाची मुभा', असा स...

महापालिकेच्या सभापतीपदी भाजप आरपीआयचे वर्चस्व

Image
  पनवेल (प्रतिनिधी)             महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे संतोष शेट्टी, तर महिला व बालकल्याण सभापतीपदी मोनिका महानवर तसेच  प्रभाग समिती 'अ' सभापतीपदी अनिता पाटील, प्रभाग समिती 'ब' सभापतीपदी समिर ठाकूर, प्रभाग समिती 'क' सभापतीपदी हेमलता म्हात्रे आणि प्रभाग समिती 'ड' सभापतीपदी सुशील घरत यांची निवड झाली आहे.         या नवनिर्वाचित सभापतींचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृहनेते परेश ठाकूर, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व कार्यकर्त्यानी अभिनंदन केले.         पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रविण पाटील, महिला व बालकल्याण सभापती कुसूम म्हा त्रे, प्रभाग समिती सभापती शत्रृघ्न काकडे, संजय भोपी, गोपीनाथ भगत आणि तेजस कांडपीळे यांचा यशस्वी कार्यकाळ संपुष्टात आल्याने या रिक्त...

इन्स्पायर अवार्ड नामांकांसाठी मुंबई विभागात रायगड जिल्हा अव्वल

Image
रायगड, प्रतिनीधी           भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागामार्फत सहावी ते दहावीच्या विद्यार्थांसाठी इन्स्पायर अवार्ड योजनेचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे ,शोध आणि विकास यांची सांगड घालून ,त्यांच्या कल्पना शक्तीला वाव देणे,समाजोपयोगी साधननिर्मिती करून ,दैनंदिन जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यास प्रेरणा देणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे. कोरानामुळे अजूनही शाळा सुरु झालेल्या नाहीत.त्यामुळे विद्यार्थ्यांचे नामांकन करणे , ही बाब शिक्षण विभागाला अवघडच होती.परंतु हे आव्हान स्वीकारून रायगड जिल्हातील ४६९ विद्यार्थ्यांचे नामांकन करण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. मुंबई ,ठाणे ,पालघर जिल्हापेक्षा जास्त नामांकन करून रायगड जिल्हा या जिल्हांपेक्षा अव्वल ठरला आहे. हे नामांकन वाढीसाठी रायगड जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग व रायगड जिल्हा गणित विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या वतीने युट्युब वर शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्री.रोहिदास एकाड सर (अध्यक्ष ,विज्ञान अध्यापक संघ पुणे) यांनी शाळा नोंदणी ,विद्यार...