सर्वांसाठी लोकल केव्हापासून?
मुंबई, प्रतिनीधी मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही लोकलसेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर खासगी व सहकारी बँकांतील कर्मचारी, त्यानंतर महिला प्रवासी, वकील, खासगी सुरक्षा रक्षक यांनाही आता लोकलची दारे काही अटींसह उघडण्यात आली आहेत. त्यानंतर आज राज्य सरकारने सर्वात मोठे पाऊल उचलत सर्व प्रवाशांसाठी लोकल प्रवासाचा प्रस्ताव रेल्वेपुढे ठेवला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक तसेच मुंबईचे पोलीस आयुक्त यांना हा प्रस्ताव देण्यात आला आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत आणि पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी हा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाला मध्य रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सर्वसामान्य प्रवाशांसाठी लवकरच लोकल ट्रेनचे दार उघडणार हे जवळपास निश्चित झाले आहे. राज्य सरकारने अशी परवानगी देणारे पत्र रेल्वेला पाठवल्यानंतर रेल्वेने त्यावर तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. याबाबत एक महत्त्वाचे ट्वीट मध्य रेल्वे कडून करण्यात आले आहे. दरम्यान, सर्व महिला प्रवाशांसाठी लोकलसेवा सुरू करण्यावरून बराच वाद रं