म्हसळा पोलिसांना चोर घाबरले,परत आणून ठेवला मुद्देमाल
म्हसळा / रायगड मत (प्रतिनिधी) काही दिवसांपूर्वी म्हसळा शहराजवळ एका प्रतिष्ठित हॉटेल विचारेमध्ये चोरी झाली होती. सर्वत्र म्हसळा तालुक्यामध्ये जबरदस्त चर्चा चालू होती. मात्र या चर्चेला आता दुसरेच वळण लागले आहे. काही लोकांनी पोलीस काय करीत नाहीत? काय करतात पोलीस? अशा वल्गणाही केल्या होत्या. मात्र पोलीस आपले डोके शांत ठेवून काम करीत होते. अत्यंत खुबीने म्हसळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे आणि त्यांचे सहकारी यांनी या चोरीची चौकशी लावून धरली. चोर हा जवळचा व माहितीतलचा असावा. याचा अंदाज पोलीसांनी बांधला आणि काय चमत्कार चोरांनी आपला चोरुन नेलेला माल हॉटेल शेजारी आणून टाकला. सगळ्यांच्या भुवया उंचावणारी ही स्टोरी. याबाबतीत धनंजय पोरे यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘दिनांक 9 ऑक्टोबर 2020 रोजी माणगांव - दिघी हायवेवर म्हसळा शहरानजीक असणा-या विचारे हॉटेल मध्ये चोरीचा प्रकार घडला. भुरट्या चोरांनी हॉटेल फोडून जवळ जवळ 60 हजार रूपये किमतीचे दोन फ्रिज चोरल्याचे निदर्शनास आले. म्हसळा पोलीस स्टेशनला 16 ऑक्टोबरपासून गुन्हा गु.र.नं.53/20 भा.द.वि.