Posts

Showing posts from October 14, 2020

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत

Image
एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. त्यांच्यासमवेत आजी-माजी आमदार आणि पदाधिकारी जाणार आहेत. मुक्ताईनगर येथे झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याचे समजते.       या बैठकीत ठरल्याप्रमाणे हा प्रवेश सोहळा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. धुळे ग्रामीणचे शिवसेनेचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे यांचा प्रचार केला होता. त्यानंतर गेल्या काही महिन्यापासून त्यांचीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाची चर्चा सुरु होती. आता ते सुद्धा खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीत जाणार आहे. खडसे यांच्याकडे झालेल्या बैठकीस मीसुद्धा उपस्थित होतो. राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात लवकरच पत्रकाराना माहिती देणार आहे, असे प्रा. पाटील यांनी सांगितले.

नात्याला काळीमा, रागात नातवाने आजोबांचीच केली हत्या

Image
नात्याला काळीमा, रागात नातवाने आजोबांचीच केली हत्या नाशिक : नाशिकमध्ये आपल्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचा रागात नातवाने आजोबांचीच हत्या केली आहे. रघुनाथ श्रावण बेंडकुळे यांचा खून नातवाने केल्याचे उघड झाले आहे. संशयित नातू किरण निवृत्ती बेंडकुळे यास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.         कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घराबाहेर जाण्यास नातवाने विरोध केला होता. तसेच शारिरीक व मानसिक त्रास देत असल्याची पोलिसांकडे तक्रार केली होती. तक्रार केली म्हणून नातवाने आजोबांच्या तोंडाला चिकटपट्टी तसच हातपाय बांधून नाल्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. आडगाव पोलीस तपासात पोलिसांनी घेतली मारुती कार ताब्यात घेतली आहे. नातवाच्या त्रासाला कंटाळून आजोबांनी एक महिन्यापूर्वी हरसूल पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग अनावर झाल्याने किरणने रविवारी (दि.११) रात्री घराबाहेर झोपलेल्या आजोबांच्या डोळे, नाक, तोंड, हाताला चिकपट्टी लावली व लोखंडी साखळीने बांधून मृतदेह मारुती ओमनीने धोंडेगाव येथून ओढा शिवारात नाशिक-औरंगाबाद महामार्गावर वैष्णवी ढाब्याच्या समोरील नाल्यात टाकला.