Posts

Showing posts from October 12, 2020

• कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे आणि म्हसळा पोलीस सहकारी यांची जबरदस्त कामगिरी • मुलीची छेड काढणाऱ्या इसमास ताबडतोब केले जेरबंद

Image
• कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे आणि म्हसळा पोलीस सहकारी यांची जबरदस्त कामगिरी • मुलीची छेड काढणाऱ्या इसमास ताबडतोब केले जेरबंद • म्हसळा तालुक्यातील नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक • मुलीने त्या इसमास जाब विचारून दाखवली हिम्मत म्हसळा (जितेंद्र नटे) raigadmat.page           म्हसळा तालुक्यात आज एक निंदनीय घटना घडली. एका 32 वर्षीय नदीम महंमद साहेब मिठागरे या इसमाने एका मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न करीत, तिच्याशी इच्छा नसताना संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तिच्याशी मोबाइल क्रमांक मागून तिच्याशी असभ्य वर्तन केले.            याबाबतीत अधिक माहिती देत असताना म्हसळा पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी 'रायगड मत' शी बोलताना सांगितले की, ती मुलगी क्लासला जाण्यासाठी आली होती. मात्र क्लास बंध असल्यामुळे ती कॉम्प्लेक्स च्या बाहेरच उभी राहिली. इतक्यात एक इसम येऊन तिच्याशी जबरदस्ती संवाद साधण्याचा प्रयत्न करीत मोबाईल क्रमांक मागू लागला. मात्र तिने विरोध केला व आरडा ओरडा केला. याचवेळी दिघी नाक्यावर ड्युटीवर असणारे वाहतूक पोलीस देविदास कारखेले आणि पोलीस हवालदार कासार यांनी यांनी तात्काळ

पोषण अभियान जनजागृतीत मोहिमेत "कुंबळे" अंगणवाडीचा सहभाग

Image
  म्हसळा :प्रतिनिधी       केंद्र सरकार व राज्यसरकार स्वयंसेवक संस्थानाच्या वतीने देशभरात १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर असे एक महीना राबवत असलेल्या पोषण महीना म्हणून जाहिर झाले होते.याचे अनुसरण म्हसळा तालुक्यातील कुंबळे अंगणवाडी येते २९ सप्टेंबर रोजी पोषण जनजागृती मोहिमेत सहभाग घेतले होते.यावेळी "सही पोषण देश रोशन" चे नारा देत म्हसळा तालुक्यातील मौजे कुंबळे येथे अंगणवाडी मध्ये कुपोषण ,सुपोषण ,बाळसंगोपण ,बाळसंरक्षण तसेच आरोग्यशिक्षण देत कौतुकिय जनजागृती करण्यात आली.         केंद्र सरकारच्या महीला बाळविकास विभागाच्या वतीने राबवत येणाऱ्या चाइल्ड लाईन जिल्हा प्रकल्पाची समन्वय संस्था असून त्याचेच नियमाचे पालन करत कुंबळे अंगणवाडीत जनजागृती केली तसेच ३० सप्टेंबर पर्यत  नियमित करुन या मोहिमाच्या माध्यमातून  नवचैतन्य निर्माण झाल्याचे माहीती ICDS कळबसकर मँडम यांनी दिली.             यावेळी कुंबळे अंगण वाडी सेविका सौ.निहारीका सातम,प्रतिभा बांद्रे ,सौ.योगीता य.जाधव अंगण वाडी सेविका (कोंझरी)सौ. स्नेहल संदेश शिगवण (तळवडे )सौ.कल्याणी कि.पालांडे (कोळे) सुरेखा बोतरे (आड़ी) प्रमिला कदम (आडी ,जंगम व

मुंबईची लाइट नेमकी कशी गेली? मुख्यमंत्र्यांनीही दखल घेतली

Image
मुंबईत अचानक लाइट गेल्यामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करुन जबाबदार व्यक्तीला शोधण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. मुंबई  : अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे मुंबई आणि उपनगरात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री यांनी गंभीर दखल घेतली आहे. तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी देखील मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आणि मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. दरम्यान, ९० टक्के भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे. भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबईतील संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत, तसेच कोण जबाबदार आहेत, त्याबाबत चौकशी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. दरम्यान सकाळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित