एक डॉक्टर, प्रत्येक वयाच्या मुलासाठी
भारत बालाजी जाधव सध्या सर्वत्र कोरोना रोगाने थैमान घातले आहे. निसर्गरम्य कोकणातील श्रीवर्धन गाव हे काही त्याला अपवाद नाही. श्रीवर्धन तसेच त्याच्या आसपासच्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. चाकरमानी गावात परत आल्यामुळे ह्या प्रकारात अजूनच वाढ झाली आहे. गावातील सर्व डॉक्टर्स कोणतेही आधुनिक सुविधा उपलब्ध नसताना त्यांच्या जिवाची बाजी लावून सर्व पेशंटना तपासत आहेत. परंतु दुदैर्व म्हणजे त्यापैकी अनेक डॉक्टर्स स्वतः कोरोनाला बळी पडले आहेत. त्यामुळे सध्या गावात डॉक्टरची टंचाई निर्माण झाली आहे. पण अशातच गावातील शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ. महेंद्र भरणे (Child Specialist), हे गावकऱ्यांच्या मदतीला धावून पुढे आले आहेत. येणाऱ्या प्रत्येक पेशंटला ते स्वतः तपासात आहेत. तसेच त्यांच्या परीने शक्य तितके उपचार कोणतीही तक्रार न करता ते करत आहेत. आपल्या गावात अत्याधुनिक उपकरण तर दूर पण आधुनिक औषध सुध्दा वेळेवर मिळणार नाहीत, पेशंटचे रिपोर्ट्स शहरातून येण्यास वेळ लागेल, पेशंटला शहरात हलविण्याची आर्थिक सोय नाही, हे ठाऊक असून पण डॉ. भरणे त्यांच्या प्रयत्नांची शिकस्त लावत आहेत. सध्या को