आठवण २६ जुलैच्या प्रलयाची..मुंबईचा जलप्रलय..
आज 26 जुलै 2020.पंधरा वर्षांपूर्वी याच दिवशी मुंबईने भयानक जलप्रलय अनुभवला होता ह्याला कारण होते ते मिठी नदी . मिठी नदी पात्र व परिसरातील मोठ्या प्रमाणातील अतिक्रमणे हि 18 किमी.मिठी नदीच्या पुराला आमंत्रण ठरली होती.त्या दिवशी साधारण 2 वाजल्यापासून पावसाने रौद्ररूप धारण केले होते 12 तासांत 944.मामी. पावसाची नोंद झाली होती. त्या दिवशी कोणाला काही समजले नाही परंतु दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तांडव शांत झाले तेव्हा समजले कि1094 लोकांना जलसमाधी मिळाली होती. पाण्याची पातळी येवढी वर गेली होती कि असहायपणे जीवमुठीत घेऊन जिथे जागा मिळेल तिथे अन्नपाण्याविना स्तब्ध होते. ज्यानी धाडस करून पाण्यातून पुढे गेले ते दूषित पाण्याने कष्टाने, मानसिकदृष्टया खचल्याने मृत्युमुखी पडले. किती जाणाचे संसार पाण्यात वाहून गेले,किती घरे बुडाली जगाची आर्थिक राजधानी असलेल्या ह्या मुंबईचे करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान जलकहराने केले होते. तो दिवस होता 26 जुलै 2005 मी माझ्या कार्यालयात विक्रोळीत ड्युटीवर वर होतो सकाळपासून पाऊस होता थांबत नव्हता लोकांचे येणें जाणे चालू होते संध्याकाळची वेळ जवळ येत होती पाऊस जास्त