Posts

Showing posts from July 24, 2020

आ.अनिकेत तटकरे यांचा पाठपुरावा.नागरिकांना मिळाला दिलासा

Image
  श्रीवर्धन - भारत जाधव : - श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात तात्पुरत्या स्वरुपात स्त्री-रोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे श्रीवर्धनकर नागरिकांना विशेषतः महिलांना दिलासा मिळाला आहे. यासाठी आ. अनिकेत तटकरे यांनी पाठपुरावा केला होता. https://amzn.to/3hxZHsi   श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व स्त्रीरोग तज्ञ डॉ.मधुकर ढवळे हे रजेवर असल्याने, श्रीवर्धन तालुक्यातील विशेष करुन प्रसूतीसाठी येणार्‍या स्त्रियांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. एखाद्या गर्भवती स्त्रीचे सिझर करण्याची वेळ आली तर त्या रुग्णाला महाड, माणगाव किंवा अलिबाग या ठिकाणी पाठवावे लागत होते. त्यामुळे श्रीवर्धनमधील काही जागरुक नागरिकांनी श्रीवर्धनचे तहसीलदार सचिन गोसावी यांना निवेदन देऊन श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ व भूलतज्ज्ञ नेमण्याची मागणी केली होती. या निवेदनाची प्रत आमदार अनिकेत तटकरे यांनाही देण्यात आली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, आ.अनिकेत तटकरे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा सुरु केला. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांचेही लक्ष व

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था (नेफडो) च्या वतीने वृक्षसंवर्धन दिनानिमित्त वृक्षारोपण संपन्न.

Image
    महेंद्र कांबळे - रायगड प्रतिनिधी - दि.२३/७/२०२० रोजी वृक्षसंवर्धन दिनानिमित्त नेफडो टीम चंद्रपूर जिल्हा तर्फे आज वृक्षसंवर्धन दिनानिमित्त मुल येथील शिवटेकडी परिसरात वड, आंबा आणि पेरु या रोपांचे रोपण करण्यात आले. तसेच टेकडी परिसरात तयार केलेले सिताफळ, चिकू , बदाम आणि आंबा या फळांचे बिजगोळे टाकण्यात आले. प्रसंगी नागपूर विभाग उपाध्यक्षा सौ. तेजस्विनी नागोसे मॅडम, चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा सौ.ललिता मुस्कावार मॅडम, चंद्रपूर जिल्हा सचिव सौ. रत्ना चौधरी, चंद्रपूर जिल्हा संघटक कविता मोहुर्ले मॅडम, ममता सुपनेर मॅडम, आणि गौरी चौधरी उपस्थित होते.

उलवे नोडमध्ये कोविड रुग्णालय तातडीने सुरु करा  -  दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची मागणी 

Image
  पनवेल  प्रतिनिधी उलवे नोडमध्ये कोविड रुग्णालय तातडीने सुरु करण्यात यावे, अशी मागणी माजी खासदार लोकनेते रामशेठ यांच्या नेतृत्वाखाली दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.         या संदर्भात समितीतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, सध्या वेगाने कोरानाचा प्रसार राज्यात आणि देशातही सुरु आहे. सिडको विकसित करीत असलेल्या उलवे नोड, तसेच उरण-पनवेल परिसरात आज कोरोनाची झपाट्याने लागण सुरू असून नागरिक भयभीत झाले आहेत. येथे वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा सक्षम नाही. क्वारंटाईन सेंटरही नाही. जिल्ह्यातील रुग्णांची वाट पाहता यंत्रणा हतबल झाली आहे. रुग्णालयांत जागा शिल्लक नाहीत. अनेक नागरिक उपचाराअभावी घरीच आहेत तसेच खासगी दवाखान्यात लुटमार सुरू असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे उलवा नोड, उरण,पनवेलतील नागरिकांना तातडीने कोविड रुग्णालयाची गरज आहे. तसेच त्या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर बेड आयसीयू  उभारण्याची गरज आहे, जेणेकरून अत्यवस्थ रुग्णाला तिथल्या तिथे उपचार