राष्ट्रीय वनसंवर्धन दिन मुंबई जिल्हा , कोंकण विभाग नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था नेफडो
आज दि.23 जुलै हा वनसंवर्धव दिन म्हणून साजरा केला जातो वृक्ष हि राष्ट्रीय संपत्ती आहे आणि ती सर्वानी जपली पाहिजे .मानवाने निसर्गाप्रति आपले ऋण व्यक्त करण्यासाठी वर्षभरात अनेक प्रकारची झाडे लावावीत व ती जगवावीत. आज औधोगिक प्रगती व मानवी सुखाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल करून वनांचे क्षेत्र कमी केले जात आहे हि सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. वृक्षांचा जन्म अर्थात वृक्षारोपण करणे म्हणजे सृष्टीची सेवा करण्याचे पुण्यकर्म होय . वृक्षारोपण केल्याने आपण नीतिमत्ता, संस्कृती व सामाजिक बांधीलकी जपतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे म्हणून कमीत कमी आपल्या परिवारातील सर्वांच्या वाढदिवसाला एक झाड लावून त्याचे संवर्धन करा. झाडे लावा पृथ्वी वाचवा प्रकाश कदम अध्यक्ष कोंकण विभाग / प्रभारी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य नेफडो.