Posts

Showing posts from July 21, 2020

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेची घाटंजी तालुका महिला कार्यकारीणी गठित

Image
  योगेश येलवे - रायगड प्रतिनिधी -नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सुयोग धस सर व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. दीपक भवर सर व महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा सौ. नीताताई लांडे तसेच अमरावती विभाग सचिव श्री अभय खेडकर सर यांच्या मार्गदर्शनात व अमरावती महिला विभाग प्रमुख डॉ. प्रिती तोटावार यांच्या उपस्थितीत दिनांक    20 /07/2020 रोजी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेअंतर्गत घाटंजी तालुका महिला कार्यकारणी गठित करण्यात आली. कार्यकारणी माहीती : 1. सौ. सोनल विकास कर्लावार -अध्यक्षा. 2.सौ. जया प्रमोद अडलवार- उपाध्यक्षा. 3.सौ. सपना सुरेश फसलवार-सचिव. 4.सौ.नीलिमा अनिल चन्नावार-संघटक सदस्यांची नावे: 5.सौ.स्वाती सूरज कर्लावार. 6.सौ. मनीषा अनिल पेंदोर. 7.सौ.सुप्रिया सागर खडसे. 8.सौ. मनीषा गजानन कर्लावार. 9.सौ. मंजूषा अमित विरदंडे. 10.सौ.विद्युलता विजय बोलचेट्टिवार. 11.सौ. सरीता रवी बोलचेट्टिवार. या प्रसंगी कागद वाचवा अभियानाअंतर्गत वही बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेत मुलांना कागद निर्मिती प्रक्रिया ,कागदाचे महत्व तसेच जुन्

उपजिल्हा रुग्णालयाच्या  विरोधात नागरिकांत उद्रेक, तहसीलदार गोसावी यांच्या कडे निवेदन सुपूर्त, उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध करण्याची मागणी 

Image
    श्रीवर्धन प्रतिनिधी -  सोपान निंबरे - उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती शस्त्रक्रिया व इतर सेवा सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात व रुग्णालयात रुग्णांवर उपचार देण्यास नकार देण्याऱ्या डॉक्टर विरोधी कारवाई करण्यात यावी या मागणी साठी श्रीवर्धन मधील कृष्णा रटाटे,  मनोज गोगटे, सुनील पवार, जुनेद दुस्ते,   शोहेब हंमदुल्ले, प्रीतम श्रीवर्धनकर यांनी तहसीलदार सचिन गोसावी यांच्या कडे निवेदन सादर केले आहे . सदरच्या निवेदनात रुग्णालयाच्या विविध त्रुटी  व सोई सुविधा संदर्भात  मागणी करण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती शस्त्रक्रिया दिनांक  5 जुलै 2020 पासून बंद आहेत .  उपजिल्हा रुग्णालयातील  डॉक्टर  प्रसूती शस्त्रक्रिया  श्रीवर्धन ला होऊ  होत नाही  त्यामुळे तुम्ही  प्रसूती शस्त्रक्रिये साठी अलिबाग  किंवा महाड ला घेऊन जा असे सरळ सरळ उत्तर दिले जात आहे . श्रीवर्धन ते महाड  किंवा  अलिबाग  हे अंतर जास्त आहे. त्यामुळे संबधित ठिकाणी पोहचण्यासाठी खूप वेळ जात आहे.  शिवाय त्या  ठिकाणच्या सरकारी दवाखान्यात उपचार मिळण्याची शक्यता कमी आहे . पर्यायाने  गर्भवती माता व तिच्या बाळाच्या जीवितास धोका निर्माण होत आहे

२२ जुलैपासून लॉकडाऊन उठणार; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला यश 

Image
        पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील लॉकडाऊन हटविण्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला यश आले आहे.         पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील जाहिर केलेला लॉकडाऊन तातडीने हटवून जनजीवन पूर्व पदावर आणण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलनात्मक भूमिका जाहीर केली होती.  त्या अनुषंगाने पनवेल महापालिकेनी क्लस्टर कंटेन्मेंट झोन व कंटेन्मेंट झोन वगळून  महापालिका हद्दीतील इतर ठिकाणी असलेला लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार दिनांक २२ जुलै सकाळी ०५ वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून सम-विषम तारखेला 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत दुकाने अटीशर्थींवर उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.              आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात, जनतेच्या भावना व्यक्त तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा उहापोह केला होता.  त्यांनी निवेदनातून म्हंटले होते कि, पनवेल महानगरपालिका हद

इनामपुरी येथील अनधिकृत टॉवर अखेर जमीनदोस्त  पालिका आयुक्तांनी दाखविली कर्तबगारी 

Image
  चुकीच्या कामांना पाठीशी घालणार नसल्याचा आयुक्तांचा निर्वाळा  टॉवरवर कारवाई झाली पण बेकायदेशीर झाडांची कत्तल राहिली  विनापरवाना टॉवर माफियांना पालिकेचा मिळाला दणका    पनवेल : राज भंडारी    पनवेल महानगरपालिका हद्दीतील खारघर येथील इनामपुरी गावातील अनधिकृत मोबाईल टॉवर बांधकाम अखेर महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशानुसार जमीनदोस्त करण्यात आले. यावेळी उशिरा का होईना पण पनवेल महानगरपालिका आयुक्तांनी आपली कर्तबगारी दाखवीत हे अनधिकृत टॉवर बांधकाम हटविण्यासाठी आदेश दिले त्यामुळे नागरिकांच्या मनात आयुक्ताबाबत असलेले गैरसमज काही अंशी कमी झाले असल्याचे समोर आले आहेत.    इनामपुरी गावातील म्हात्रे यांच्या जागेत उभा करण्यात आलेले मोबाईल टॉवरचे बांधकाम हे त्यांच्याच जागेत उभे आहे किंवा हाय टेन्शन वायरच्या उभारणीमध्ये ती जागा या विद्युत वितरण कंपनीची आहे, याचा तपास करण्याची आता गरज निर्माण झाली आहे. सदर मोबाईल टॉवर उभारणारे माफिया हे शासनाच्या डोळ्यात धूळ फेकूनच टॉवर उभारणीचे काम करित आहेत का ? असा सवालही यामुळे समोर आला आहे. आज पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून जरी टॉवरचे बांधकाम तोडण्यात आ