चिपळे ग्रुप ग्राम पंचायतीची कोरोनाला आमंत्रण
पनवेल/वार्ताहर पनवेल तालुक्यातील शहरालगत असणाऱ्या चिपळे ग्रुप ग्राम पंचायतीच्या हद्दीमध्ये वेळीच घनकचरा उचला जात नसल्यामुळे येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. चिपळे ग्रुप ग्राम पंचायत हद्दीतील मौजे कोप्रोली येथील क्वालिटस गार्डन को ऑपरेटिव्ह हौसिंग या २३२ मध्यमवर्गीय सदनिकाधारकांचा या सोसायटीतच कचऱ्याचा ढीग गेल्या पंधरा दिवसांपासून कुजलेल्या अवस्थेत पडला आहे.ग्रामपंचायती कडे सोसायटीतील लोकांनी वारंवार विनंती करून ही ग्रामपंचायतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत सोसायटीतील नागरिकांनी आपल्या कचऱ्याची स्वतःच विल्हेवाट लावावी असे अजब लेखी पत्राने उत्तर दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक बाहेर पडण्यास धजावत नाही तर आता कचरा टाकण्यासाठी कुठे जायचे?असा यक्षप्रश्न सोसायटीतील नागरिकांना पडला आहे. एकीकडे कोरोनाची भिती त्याच बरोबर कचऱ्याची दुर्गंधी अश्या परिस्थितीत येथील नागरिक जीवन जगत आहेत.या घाणीमुळे तसेच त्यापासून सुटलेल्या दुर्गंधीमुळे कोरोनाचा प्रसार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.उद्या या घाणीमुळे सोसायटीतील नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिण