राजगृह वरील हल्ल्यातील आरोपी अद्याप अटक का झाले नाहीत याकरिता वंचित बहुजन आघाडी माणगांव तालुक्याच्या वतीने निषेध व्यक्त करणारे प्रशासनाला निवेदन दिले
योगेश येलवे - मुंबई प्रतिनिधी - भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडक" यांच्या राजगृह ह्या निवस्थानावर हल्ला करणारे अद्याप जेबरबंद का झाले नाहीत ? या करिता निषेध व्यक्त करणारे पत्र मा,उपविभागीय अधिकारी माणगांव यांच्या मार्फत मा, मुख्यमंत्री महोदय याना आज वंचित बहुजन आघाडी माणगांव तालुक्याचे तरुण तडफदार युवानेते माणगांव तालुका महासचिव मा,रोहन साळवी यांच्या वतीने देण्यात आले सदर आरोप लवकरात लवकर अटक झाले पाहिजेत आणि या मागचा सूत्रधार लवकरात लवकर जनतेच्या समोर यायला हवा ही मागणी या निवेदनातून करण्यात आली आणि जर का हे आरोपी मिळायला अजून विलंब होत असेल तर वंचित बहुजन आघाडी माणगांव तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे देखील जाहीर करण्यात आले आहे सदर निवेदन हे वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा अध्यक्ष मा.विश्वतेज साळवी आणि रायगड जिल्हा महासचिव मा,सागर भालेराव यांच्या सुचनेने देणायत आले,सदर निवेदन देताण पुढील युवा कार्यकर्ते उपस्थित होते,कॉर्नर ग्रुप् लोनेरे चे संस्थापक, नरेश टेंबे, संदेश जांम्बरे, हरशल शिदे, रोहित सकपाल, शैलेश मोरे, अनिकेत साळवी, अतिष टेंबे. ...