Posts

Showing posts from July 8, 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञात जातीयवादी समाजकंठकांकडून तोडफोड !

Image
  महेंद्र कांबळे - मुंबई प्रतिनिधी - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील दादर येथील  निवासस्थान असलेले 'राजगृहा'वर काल  संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.   राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.   काल संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केलंय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे.    आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी आंबेडकरी समाजाकडून करण्यात येत आहे..      

म्हसळा तालुक्यात 44 गावे अजूनही अंधारातच

Image
म्हसळा / जितेंद्र नटे           3 जून 2020 ला जी वीज गेली ती अजूनही आलीच नाही. शहर वासियांना वीज पुरवठा आणि गाववाल्यानी वाट बघा? अशी अवस्था सध्या म्हसळ्यात आहे. तातडीने समस्या सोडविणारे नेते मंडळी अजून नुकसान ग्रस्थाना मदत मिळवून देऊ शकले नाहीत? याचे सारखे दुसरे दुर्दैव नाही. सत्ताधारी आणि विरोधी आले आणि भेट देऊन गेले. सगळ्यांना वाटले भरपूर मदत मिळेल, लवकर वीज येईल. मात्र भ्रमनीरास झाला. लोक गप्प बसली आणि फसली. थंड आहेत म्हसळा वाले ते काय करणार? त्यामुळे नेते मंडळी यांना जास्त विचारत घेत नाहीत. कुणीही वाली नाही अशी अवस्था श्रीवर्धन मतदार संघाची झाली आहे. म्हसळ्या तालुक्यातील MSEB वानखेडे अधिकारी यांच्याशी जितेंद्र नटे यांनी संपर्क साधला असता. त्यांनी सांगितलेली परिस्थितीत भयानक आहे. 13 एजेंट ला काम दिले आहे, मात्र हे एजंट काम फास्ट करीत नाहीत. कोकणातील झाडी - झुडपे आणि डोंगर भागात काम करण्याची त्यांना सवय नाही, असे ते सांगतात. काही ठिकाणी मशीन पोचत नाहीत. तर काही एजंट काम टाकून गेले. एकूण 130 कर्मचारी काम करीत आहेत. अजून मॅनपॉवर पाहिजे आहे. अश्या अनेक समस्या आहेत. आपले कर्मचारी पावसात