Posts

Showing posts from July 6, 2020

एक हात मदतीचा ...माता रमाई स्मृति प्रतिष्ठानयांच्या वतोने आश्रमातील मुलांना खाऊ वाटप .

Image
      मुंबई प्रतिनिधी - महेंद्र कांबळे -   माता रमाई स्मृति प्रतिष्ठान (माता रमाई स्मारक ) वरळी  यांच्या वतीने आणि वरील प्रतिष्ठाण चे सदस्य अमोल आनंद निकाळजे, सुशील मिसाळ,सचिन कांबळे, विजय साळुंखे यांच्या सहकार्याने कोरोना महामारिच्या संकटात वरळी विभागातील "द वात्सल्य संस्था आनंद निकेतन या आश्रमातील लहान मुलांना दि. 6 जुलै 2020 रोजी " बिस्कीट (खाऊ) वाटप " करण्यात आले.  यावेळी  संस्थापक, अध्यक्ष अमोल साळुंके, सचिव प्रकाश डोळस, सदस्य  मनोज मर्चंडे, निखिल चव्हाण,अविनाश साळुंके व प्रतिष्ठाण चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते.उपस्थित होते.

पनवेल उपजिल्हा रुग्णालय व पनवेल महापालिका देवेंद्र फडणवीस यांची भेट मनपा आयुक्त व रुग्णालय अधीक्षकांशी केली चर्चा 

Image
  पनवेल(प्रतिनिधी)  पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झालेला आहे. परिणामी दररोज २०० हून अधिक रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे या भागात चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पनवेल उपजिल्हा रुग्णालय आणि महानगरपालिकेला भेट दिली. त्यांनी मनपा आयुक्त आणि रुग्णालयाच्या अधीक्षकांकडून कोरोना विशेष स्थिती आणि उपचाराबाबतचा आढावा घेतला.      पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या अडीच हजारांच्या वर गेली आहे. आता २४ तासात जवळपास दोनशे रुग्णांची नोंद होत आहे. मृत्यूचा आकडाही शंभरी गाठण्याच्या तयारीत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असले तरी वाढती रुग्ण संख्या चिंतेची बाब ठरु लागली आहे. दरम्यान नव्याने स्थापन झालेल्या पनवेल मनपाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. त्याच बरोबर इतर वैद्यकीय सुविधा सुद्धा तोकडया आहेत. पनवेल ग्रामीण भागांमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपासून दररोज सुमारे पन्नास रुग्णांची नोंद होत आहे. ग्रामीण भाग रुग्णांच्या बाबतीत महापालिकेशी स्पर्धा करताना दिसत आहे.

प्रदेश भाजपची कार्यकारिणी जाहीर  लोकनेते रामशेठ ठाकूर प्रदेश कार्यसमिती विशेष निमंत्रित सदस्यपदी

Image
  पनवेल(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीच्या राज्य कार्यकारिणीची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केली.  या कार्यकारणीत १२ प्रदेश उपाध्यक्ष, ०५ महामंत्री, ०१ कोषाध्यक्ष, प्रदेश कार्यसमिती विशेष निमंत्रित सदस्य, कार्यसमिती सदस्य, निमंत्रित सदस्य, मोर्चा, प्रकोष्ट, मिडिया, सोशल मिडिया,  आदी समितीचा समावेश आहे.  राज्याच्या सर्व सामाजिक स्तर आणि भौगोलिक क्षेत्रांना न्याय देण्यासाठी या कार्यकारणीचा उपयोग होईल अस मत यावेळी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. प्रदेश कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी  राम शिंदे, जयकुमार रावळ, संजय कुटे, माधव भंडारी, सुरेश हलवणकर, प्रीतम मुंडे, प्रसाद लाड, चित्रा वाघ, माधवी नाईक, कपिल पाटील, डॉ. भारती पवार, जयप्रकाश ठाकूर, महामंत्री म्हणून सुजितसिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय, संघटन महामंत्री म्हणून विजय पुराणिक, कोषाध्यक्षपदी मिहीर कोटेचा, तर प्रदेश कार्यसमिती विशेष निमंत्रित सदस्यपदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, रा

रायगड मत' च्या बातमीची घेतली दखल, मदत निधी 2 दिवसात होणार Ac ला ट्रान्सफर 

Image
  म्हसळा (जितेंद्र नटे)   रायगड मत च्या बातमीची दखल घेत नुकसानग्रस्त मदत निधी वाटपाचा वेग वाढला आहे. तहसीलदार गोसावी साहेब, तसेच SBI बँक मॅनेजर आणि कर्मचारी यांचेशी बोलणे झाले आहे. पुढील 2-3 दिवसात सर्व लिस्ट पूर्ण होतील. अडचण अशी आहे कि Transfer करण्याचे काम फक्त Sbi बँकच करीत आहे. का? कारण शासन आदेश तसें आहेत. त्यामुळे एकच बँकवर प्रेशर आला आहे. खरे तर बँक ऑफ इंडिया चे AC जास्त आहेत. त्यामुळे म्हसळ्यातील सर्व बँकाना वाटप विभागून दिले पाहिजे होते मात्र तसें झाले नाही. त्यामुळे प्रॉब्लेम होत आहे. Sbi मधील Ac चे पैसे ट्रान्सफर पण झाले. मात्र इतर बँकेचे AC ट्रान्सफर करताना SBIला NeFT करावे लागत आहे. सर्व मॅटर मराठीत असल्याने ही त्यांना अडचण येत आहेत. सॉफ्ट कॉपी म्हणजे एक्सेल फाईल मिळाली तर ते काम लवकर करू शकतात. म्हणून आता तहसील कार्यालय येथे संपर्क साधून सॉफ्ट कॉपी त्वरित द्यावी म्हणजे नावे आणि A/C कॉपी करून लवकरात लवकर ट्रांसफर करता येतील. अन्यथा सर्व 5 Colum भरून आणि नावाची, A/c No ची खात्री Manualy करावी लागत आहे. त्यामुळे उशीर लागत आहे, असे sbi चे नवले यांनी सांगितले आहे. Sbi चे Mang