दक्ष नागरिक संस्थेची महाराष्ट्राची प्रथम सभा संपन्न व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे सभेचे आयोजन महाराष्ट्रातील एकूण 15 जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतला सहभाग
प्रतिनिधी - संपूर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे सरकारने घेतलेल्या लॉकडाउन च्या या निर्णयाला दक्ष नागरिक संस्था (DNS) चे देशभरातील पदाधिकारी तसेच पत्रकार, महिला, चित्रपट, अल्पसंख्याक, क्रिडा, विभागातील सभासदांनी पाठिंबा दर्शवला असून सरकार ला भविष्यात जर मनुष्यबळाची गरज भासली तर संपूर्ण देशभरातून दक्ष नागरिक संस्थेचे पदाधिकारी तसेच सभासद निस्वार्थपणे मदतीला उभे राहतील असे दक्ष नागरिक संस्था (DNS) चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी यांनी मार्गदर्शन करताना व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे सांगितले आहे. दक्ष नागरिक संस्था (DNS) ची महाराष्ट्र राज्याची पहिली सभा दिनांक २८ जून २०२० रोजी संपन्न झाली. लॉकडाउन मुळे बाहेर सभा घेण्यास शक्य नसल्यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे हि सभा घेण्यात आली.या सभेत दक्ष नागरिक संस्था (DNS) चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रेयस ठाकुर, राष्ट्रीय उपाध्यक्ष अफ्रोज सय्यद, राष्ट्रीय सल्लागार विंग कमांडर राजेंद्र महानुभाव,राष्ट्रीय सल्लागार प्रकाश राणे,महाराष्ट्र संपर्क प्रमुख नामदेव कोळी, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष