महावितरण कंपनीमार्फत आकारण्यात येणाऱ्या वाढीव भरमसाठ वीजबिलांबाबत वीज ग्राहकांच्या अनेक तक्रारी
महावितरण कंपनीमार्फत आकारण्यात येणाऱ्या वाढीव भरमसाठ वीजबिलांबाबत वीज ग्राहकांच्या अनेक तक्रारी येत असून सध्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत वीज ग्राहकांना होत असलेल्या अकारण त्रासाची दखल घेऊन पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ब चे सभापती नगरसेवक श्री. संजय भोपी साहेब यांनी वीजबिले ग्राहकांच्या वापराप्रमाणे व योग्य पद्धतीने आकारण्याबाबत तसेच बिल एकत्रितपणे न घेता टप्याटप्याने सुयोग्य मासिक हप्त्यात बिल भरण्याची मुभा देऊन वीज ग्राहकांना दिलासा देण्यात यावा याबाबतचे लेखी निवेदन मा. कार्यकारी अभियंता, महावितरण - खांदा कॉलनी यांना दिले असून सदर प्रकरणात विशेष लक्ष देण्याबाबत मा. मुख्यमंत्री साहेब, मा. ऊर्जा कॅबिनेट मंत्री, मा. ऊर्जा राज्यमंत्री, मा. जिल्हाधिकारी मॅडम, मा. आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांना ई - मेल द्वारे निवेदन पाठवून विनंती करण्यात आली आहे. तरी विज ग्राहकांनी कोणत्याही प्रकारे घाबरून जाऊ नये. मार्च, एप्रिल व मे असे तीन महिन्यांचे एकत्रित आलेले बिल सप्टेंबर अखेरपर्यंत सुलभ हप्त्यांमध्ये भरण्याची मुभा देण्यात आली असून लॉकडाऊन कालावधीत गावी असलेल्या