राज्यातील वाढत जाणारे मागासवर्गीय, बौद्ध,भटक्यांवरील अन्याय अत्याचारांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी दक्षिण मुंबईच्या वतीने जनआंदोलन...
महेंद्र कांबळे - मुंबई प्रतिनिधी - आज दि. १७/०६/२०२० रोजी दु.१२.०० वाजता वंचित बहुजन आघाडी दक्षिण मुंबई जिल्ह्याच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी (मुंबई शहर) येथे जनआंदोलन करत आरोपींविरुद्ध त्वरित कारवाही करावी या बाबद निवेदनही देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मुंबई सदस्य रमेशजी कांबळे,मुंबई सदस्य मनोजजी मर्चंडे, मुंबई सदस्य ऍड.विजयजी वाघ, त्याचबरोबर शशिकांतजी लिंबारे, राकेशजी कांबळे, अमोल साळुंके, संजय पवार, विनोद वारे, अशोक गूजेट्टी, संदीप रांजनकर, अशोक कदम,राजू बावधनकर,राजू बडेकर,बाबू वळंजू, ऍड संतोष बनसोडे, चंद्रकांत जाधव,प्रवीण शेवडे, प्रिंतेश मांजलकर,सुशांत जाधव व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी,आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. नागपूरच्या नरखेड मधील पिंपलधरा गावातील अरविंद बनसोड व पुणे पिंपरी चिंचवड येथील विराज जगताप या बौद्ध युवकांचा जातीय वादातून हत्या केल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यात जनआंदोलने करून निवेदने देण्यात आली आहेत. बहुजनांवरील अन्याय आणि अत्याचार