Posts

Showing posts from June 11, 2020

रायगड मत चे संपादक जितेंद्र नटे यांनी चक्रीवादळा मुळे नुकसान झालेल्या लोकांपर्यंत पोहचून त्यांच्या व्यथा शासनापर्यंत पोहचविनाचा प्रयत्न करीत आहे पहा संपादक जितेंद्र नटे यांची ग्राउंड रिपोर्टिंग

Image

शैक्षणिक शुल्काबाबत धोरण ठरविण्यात यावे, पनवेल महानगरपालिका विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

Image
पनवेल : ऑनलाइन शालेय शिक्षण पद्धतीमध्ये शाळांकडून घेण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्काबाबत धोरण ठरविण्यात यावे अशी आग्रही मागणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी राज्याच्या शिक्षण मंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.             प्रितम म्हात्रे यांनी दिलेल्या निवदनात म्हटले आहे की, प्रत्येक शाळेने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी संपूर्ण शुल्क जमा करण्याचे ठरविले आहे आणि ते ऑनलाईन वर्ग उपलब्ध करुन देतील. या प्रणाली व कार्यपद्धतीमुळे वीज बिल, मासिक ओव्हरहेड खर्च आणि इतर बचतीसह आवर्ती खर्च कमी होऊन शैक्षणिक संस्थांचा आर्थिक भार कमी होणार आहे. या कोरोना साथीच्या परिस्थितीत राज्यातील पालकांवर फी देण्याचे ओझे आहे आणि कोणत्याही शाळांनी शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतलेले माहितीत नाही. मुंबईतील कोरोनाच्या सद्यस्थितीनुसार काही महिने तरी यापुढे कोणतीही शाळा शालेय वर्ग सुरू करू शकणार नाही आणि राज्यातील पालकांना शालेय फी सक्तीने देण्यास त्रास होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या विषयावर लक्ष देऊन ऑनलाईन शाळा शुल्काबाबत आपले विशिष्ट धोरण ठरवून सर्व राज्यात लागू करावे. अशी विनंती करण्यात आल

अश्वारूढ मावळे आणि झूल घातलेल्या हत्तींच्या शिल्पांमुळे  शिवाजी चौकाच्या सौंदर्यात भर

पनवेल(प्रतिनिधी) पनवेल शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळया जवळ उद्यानात मंगळवार 9 जून रोजी अश्वारूढ मावळे आणि झूल घातलेल्या हत्तींचे शिल्प बसवण्यात आल्याने शिवाजी चौकाच्या सौंदर्यात भर पडली असून पनवेलकरांनी हे शिल्प  पहाण्यासाठी आणि त्याचे फोटो काढण्यासाठी सकाळपासून त्याठिकाणी गर्दी केली होती. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालणासाठी  केलेल्या या पाठपुराव्या बद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत होते.            पनवेल  महानगर पालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका आहे. रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी  महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरण प्रस्तावाला स्थायी समितीच्या शुक्रवार 1 मार्च 2019 रोजी मनोहर म्हात्रे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या  तातडीच्या सभेत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी मे. सोनाली कन्स्ट्रकशन यांच्या न्युनतम एक कोटी 42 लाख 54 हजाराच्या निविदेला मान्यता देण्यात आली होती. यामध्ये डॉक्टर ब

समाजसेवक किरण मढवी यांचे मरणोत्तर नेत्रदानाचे संकल्प

Image
  १० जून- जागतिक दृष्टिदान दिनाचे औचित्य साधून उलवे येथील समाजसेवक किरण एकनाथ मढवी यांनी आज लक्ष्मी चँरिटेबल ट्रस्ट पनवेल येथे मरनोत्तर नेत्रदान संकल्प अर्ज भरुन नेत्रदान करण्याचे निर्धार केले. त्याप्रसंगी किरण मढवी यांना  डॉ. सचिन भुमकर, डॉ. भुपेश जैन आणि डॉ. रिटा धामणकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी लक्ष्मी चँरिटेबल ट्रस्टचे समाजिक कार्यकर्ते विनोद पाचघरे आणि समाजसेवक प्रकाश पाटील आणि मनोज पाटील आदी उपस्थित होते. यावेळी लक्ष्मी चँरिटेबल ट्रस्टनी समाजसेवक किरण मढवी यांच्या या कार्याबद्दल कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कै. संदेश जोशी याच्या स्मरणार्थ मदत

Image
कै. संदेश जोशी याच्या स्मरणार्थ स्वर्गीय संदेश जोशी ग्रुप पेठगाव यांच्या वतीने पनवेल महानगर पालिका स्वछता दूत यांचा शाल, मास्क, आर्सेनिक अल्बम ३० रोगप्रतिकारक शक्ती, बिस्किट, फ्रूटी देऊन सन्मान करण्यात आला.तसेच ओवे घोलवाड़ी फरशिपाडा,फनसवाडी बेलपाडा, कातकर वाड़ी येथे बिस्किट, फ्रूटी, मास्क,  अश्या विविध वस्तुचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे विभागीय अध्यक्ष प्रभाकर जोशी व इतर. 

स्वच्छता मोहीम

Image
निसर्ग चक्रीवादळाचा पनवेललाही तडाखा बसला, यामध्ये  झाड्यांच्या फांदया तु टल्यामुळे  त्याचबरोबर लॉक डाऊन शिथिल झाल्यानंतर रहदारीची वर्दळमुळे कचऱ्याचे प्रमाण वाढल्याने साफसफाई करण्यासाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग १९ मध्ये भाजपच्यावतीने दोन दिवसीय स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, पवन सोनी आदी सहभागी झाले होते

जिल्हा संघटन सरचिटणीसअविनाश कोळी यांना मातृशोक 

Image
पनवेल(प्रतिनिधी) भाजपचे रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी यांच्या मातोश्री शालिनी महादेव कोळी यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी आज (सोमवार, दि. ०८)  अल्पशा आजाराने निधन झाले.  त्यांच्या पश्चात पती महादेव कोळी, तीन विवाहित मुले सुभाष, अविनाश, नंदू, विवाहित मुलगी सुषमा, सुना, जावई, नातवंडे, असा मोठा परिवार आहे.          शालिनी यांच्या पार्थिवावर पनवेल येथील कोळीवाडा स्मशानभूमीत फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळून अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेस महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे शहर मंडल अध्यक्ष जयंत पगडे, शहर सरचिटणीस नगरसेवक नितीन पाटील, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.          शालिनी यांच्या निधनाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी पालकमंत्री आ. रविंद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, कला, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.