Posts

Showing posts from June 7, 2020

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबई सदस्य आयु. रमेश काशीराम कांबळे यांनी चंदनवाडी परिसरात मास्क आणि साॅनिटायजर चे वाटप केले.

Image
  महेंद्र कांबळे - मुंबई प्रतिनिधी   COVID-19 या संसर्गाशी सुरु असलेल्या लढाईला बळ मिळावे तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडीचे मुंबई सदस्य रमेशजी कांबळे यांच्या वतीने संपूर्ण लॉक डाउन दरम्यान अनेक उपक्रम राबवले गेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून चंदनवाडी येथे स्थानिक रहिवाशी यांना मास्क आणि साॅनिटायजर  वाटप करण्यात आले.     कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घ्या. घराबाहेर पाडताना मास्कचा वापर करा, वेळोवेळी सॅनिटायझर ने हात स्वच्छ करा, एकमेकांपासून अंतर ठेवा, असे अवाहन वंचित बहुजन आघाडीचे  मुबंई सदस्य रमेशजी कांबळे यांनी केले      

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Image
भंगारपाडा येथील गरीब गरजूंना मदतीचा हात आमदार महेश बालदी यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा पुढाकार पनवेल (प्रतिनिधी)- कोरोना विषाणूंचे संक्रमण होऊ नये म्हणून गेल्या अडीच महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. भंगारपाडा येथील अशा गरीब आणि गरजूंना तसेच रिक्षाचालकांना रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला. शनिवारी आमदार महेश बालदी यांच्या हस्ते या गावात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.    लॉकडाऊन च्या काळात अनेकांच्या हाताला काम राहिलेले नाही. त्यामुळे रोजगार पूर्णपणे बंद झालेला आहे. विशेष करून रिक्षाचालकांची अतिशय बिकट अवस्था आहे. अशा गरिब व  गरजूंसाठी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गेल्या अडीच महिन्यांपासून अन्नदान तसेच अन्नधान्य वाटपाचे काम सुरू आहे. शनिवारी भंगारपाडा गावात विकास मंडळाच्या  वतीने जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या माध्यमातून गरजवंतांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी मच

विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या कार्य तत्परतेने विद्युत पुरवठा झाला सुरळीत 

Image
पनवेल : निसर्ग चक्रीवादळाने रायगडवर मोठे संकट कोसळले होते. घरांचे कौल, पत्रे उडून फार मोठे नुकसान ग्रामीण तसेच शहरी भागात झाले. चक्रीवादळामुळे विद्युत पोल, झाडे पडून विद्युत पुरवठा खंडित झाला होता. ह्या वादळात पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते तथा संघर्षयोद्धा ( कोविड योद्धा ) प्रितम दादा म्हात्रे यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. त्यावेळी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी सातत्याने वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्कात राहून तो वीज पुरवठा सुरळीत करून घेतला.. यासंदर्भातसुद्धा रहिवाशांनासुद्धा वारंवार माहिती देत राहीले. याबद्दल स्थानिक रहिवाशांनी प्रितम म्हात्रे यांचे आभार मानले आहेत.          पनवेल शहरातील घाटे आळी, भगत आळी, यशोपुरम सोसायटी, लाईन आळी येथे विद्युत पोल पडल्यामुळे दिनांक ३  जून रोजी पासून विद्युत पुरवठा खंडित होता. त्यामुळे अनेक वीजेच्या लाईन खंडीत झाल्या. मुसळधार पावसामुळे वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना काम करणे मुश्किलीचे झाले होते. पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी एमएसईबी (महाव

अरबी समुद्रातील निसर्ग चक्रीवादळच्या  हाहाकारा नंतर ची परिस्थिती

Image
(संदेश घोलप-श्रीवर्धन):  निसर्ग चक्रीवादळ दोन दिवसापूर्वी कोंकण किनारपट्टीला येऊन धडकलं हवामान खात्याने दिलेल्या अंदाजा नुसार हे वादळ अतिसंहारक चक्रीवादळात परावर्तीत झालं चक्रीवादळच केंद्र बिंदू असलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील अनेक गाव अनेक कुटुंब व संसार  उघड्यावर पडले समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील तसेच रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे झाडे कोसळून पडली, विद्युत खांब कोसळले, घरांवरचे छप्पर उडाले, घरांच्या भिंती कोसळल्या,घर कोसळली,अनेकांच्या घरांवर झाडे पडली आहेत कोळी बांधवाच्या होड्यांचं तसेच वाहनाचा देखील नुकसान झालं होत्याच नव्हतं झालं स्वर्ग भूमी म्हणून ओळखलं जाणाऱ्या कोंकणच अतोनात नुकसान झालं आणि कोंकणच पुर्ण चित्रच पालटलं आंबा,सुपारी,नारळ,काजूची व इतर झाड मुळांसहित उलमळूनपडली त्यामुळे विद्यतु पुरवठा खंडित झाला असून रस्त्यावर झाडें पडली असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे सर्व नागररिक अंधारात आहेत पुढील काही दिवस त्यांना अंधारात रात्र काढावी लागणार आहेत लाईट नसल्याने पाणी नाही अन्नधान्य भिजलं आहे आजारी माणसांना औषधांची गरज आहे काही ज

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी    वारदोली, बेलवली परिसरात, वाड्या वस्तीला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद 

Image
  पनवेल (प्रतिनिधी)  निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात मोठी हानी झाली आहे. याचा फटका पनवेल तालुक्यालाही बसला.  या पार्श्वभूमीवर भाजपचे रायगड उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज(शनिवारी) वारदोली, बेलवली परिसरात, वाड्या वस्तीला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधत लवकरात लवकर संबंधित वादळग्रस्तांना शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.             यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे तालुका मंडल सरचिटणीस राजेंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा मोर्चाचे तालुका मंडल अध्यक्ष आनंद ढवळे, सरपंच बबन पवार, माजी सरपंच जगदिश ढवळे, आप्पा भागीत, संदेश पाटील, जितू बताले, नारायण भोपी, सागर फडके, जगदीश केंगे, नामदेव भूतांबरा आदी उपस्थित होते.आज वारदोली, हालटेप ठाकूरवाडी, बेलवली, तारटेप ठाकूरवाडी आदी ठिकाणी पाहणी केली.  दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी नेरे आणि शिरवली परिसरातील आदिवासी वाड्या व पाडयामध्ये भेट देऊन पाहणी केली व नागरिकांना दिलासा दिला.             निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील लाखो घरांचे नुकसान झाले आहे. या वादळाच्या तांडवामुळे लाखो झाडे उन्मळून

वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न

Image
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात आलेल्या खालापूर, चौक, मोहोपाडा, रसायनी येथील बऱ्याच ठिकाणी विद्युत खांबांवर झाडे पडून वीजपुरवठा खंडित झाला आहे. याप्रसंगी त्वरित आमदार महेश बालदी यांनी मोहोपाडा येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये MSEDCL(मोहपाडा) चे कार्यकारी अभियंता मनोज जगताप, सहायक अभियंता किशोर पाटील यांच्या समवेत काल तातडीची बैठक घेऊन या परिसरात खंडित झालेला विद्युत पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत कसा करता येईल यासंदर्भात चर्चा करून मनोज जगताप यांच्याकडून लवकरात लवकर वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन घेतले. या वेळी खालापूर तालुका सरचिटणीस  प्रवीण जांभळे, वासंबे विभाग जिल्हा परिषद अध्यक्ष सचिन तांडेल, वासंबे पंचायत समिती अध्यक्ष आकाश जुईकर, युवा मोर्चा कार्यकर्ते जयदत्त भोईर, अमित शाह, मनोज सोमाणी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.        

वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मढवी दाम्पत्याकडून वटवृक्ष लागवड

Image
उलवे येथील समाजसेवक किरण एकनाथ मढवी व त्यांच्या पत्नी हेमल मढवी यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन व वटपौर्णिमेचे औचित्य साधून परिसरात वटवृक्षांचे रोपण करण्यात आले.  आज बऱ्याच ठिकाणी वडाच्या फांद्या तोडुन वटपौर्णिमा साजरी केली जाते. त्यामुळे राष्ट्रीय प्रतिक असलेला वटवृक्ष संवर्धनाची ही काळाची गरज ओळखुन उलवे येथील मढवी  दाम्पत्याने वटवृक्षाचे लागवड करुन वटपौर्णिमा साजरी केली.       

पनवेल तालुक्यातील नुकसान झालेल्या आदिवासी बांधवांची विचारपूस आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आदिवासी वाड्या आणि पाडयांची पाहणी 

Image
  पनवेल (प्रतिनिधी)  रायगडात निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे. याचा फटका पनवेल तालुक्यातील आदिवासी वाडया आणि पाड्यांना सर्वाधिक बसला आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे रायगड उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (शुक्रवारी) चक्रीवादळ ग्रस्त भागात जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्तांची विचारपूस करून त्यांना दिलासा दिला.             यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका मंडल सरचिटणीस राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य राज पाटील, आदी उपस्थित होते.            ०३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील पाच लाख घरांचे नुकसान झाले आहे. या वादळाच्या तांडवामुळे लाखो झाडे उन्मळून पडले आहेत. त्याचबरोबर वाहनांवर महाकाय वृक्ष पडून मोठे नुकसान झाले आहे. निसर्ग चक्रीवादळाचा फटका पनवेल तालुक्यातील नेरे आणि शिरवली परिसराला मोठ्या प्रमाणात बसला. तालुक्यात जवळपास दोन हजार घरांची पडझड झाली आहे. सव्वादोनशे एकर शेतीचे नि

करंजाडे कॉलनीत अर्सेनिक अलबम ३० गोळ्यांचे १२०० कुटुंबाना वाटप

Image
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त करंजाडे कॉलनीत रोगप्रतिकार  वाढविणाऱ्या अर्सेनिक अलबम ३० गोळ्यांचे १२०० कुटुंबाना भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे यांच्या तर्फे मोफत वाटप करण्यात आले.तसेच २००० मास्क चे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास करंजाडे विभाग अध्यक्ष कर्णा शेलार, सुनील साबळे, करंजाडे भाजप शहर अध्यक्ष मिरेन्द्र शहारे, करंजाडे ग्रा प सदस्य नाथा भरवाड, निलेश गायकवाड, भरत साबळे ,संतोष विखारे, अजय साबळे, नंदकुमार फ़डके, सागर आंग्रे  आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. (छाया-हर्षद कोळी)