Posts

Showing posts from June 4, 2020

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे आणखी निराधार परप्रांतियांना आधार 

Image
    पनवेल(प्रतिनिधी) कोरोना विषाणू प्रादुर्भाव आणि लॉक डाऊन परिस्थितीमुळे बिना निवारा फसलेल्या निराधार ११ परप्रांतियांना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गर्शनाखाली मदतीचा आधार देण्यात आला आहे. .               नवीन पनवेल परिसरात ११ निराधार परप्रांतीय बिनाआधार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दर्शन पोपट यांच्या निदर्शनास आले. व त्यांनी हि बाब आमदार प्रशांत ठाकूर यांना सांगितली. त्यानुसार त्यांनी ताबडतोब नगरसेवक संतोष शेट्टी यांच्याशी संपर्क करून त्यांना मदतीची सूचना केली. त्यानुसार नगरसेवक संतोष शेट्टी व त्यांच्यासोबत गुरुद्वाराचे सदस्य गगन सिंग आनंद, दर्शन पोपट यांनी या ११ निराधार परप्रांतीयांची योग्य प्रकारे सोय केली.            सध्याच्या परिस्थितीत काही गरीब आणि निराधार मजुरांना गावी जाता येत नाही. मुळचे झारखंडचे असलेले हे नागरिक पनवेल परिसरात मोलमजुरीचे काम करीत आहेत. कोरोना व लॉक डाऊनमुळे हे ११ जण निवाऱ्यापासून वंचित होते. त्यांना लॉक डाऊन झाल्यापासून गुरुद्वाराच्यावतीने नियमितपणे भोजन दिले जात होते. पाऊस व वादळ यामुळे ते कंटेनर वाहनाखाली जीव मुठीत राहून व

महापौर सहाय्यता निधीस परेश ठाकूर व अर्चना ठाकूर यांची आर्थिक मदत

Image
    माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवानिमित्त त्यांचे चिरंजीव सभागृहनेते परेश ठाकूर व अर्चना परेश ठाकूर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत म्हणून पनवेल महापालिकेच्या महापौर निधीत प्रत्येकी एक लाख रुपये अशी एकूण ०२ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. सदरचे धनादेश आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी उपायुक्त जमीर लेंगरेकर उपस्थित होते.           

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  दैनिक किल्ले रायगडचे डिजिटल क्षेत्रात पदार्पण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन वाचकांसाठी आता वेबसाईट, युट्युब , फेसबुक आणि ट्विटर पेज

Image
    पनवेल(प्रतिनिधी) पनवेल येथील सर्वात जुने वर्तमानपत्र असलेल्या दैनिक किल्ले रायगडने आता डिजिटल क्षेत्रात पाऊल टाकले आहे. वेब पोर्टल, युट्युब, फेसबुक व ट्विटर पेज सुरू करण्यात आले आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डिजिटल किल्ले रायगडचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह महापौर डॉ कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेविका रुचिता लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ झाला. ५२ वर्षापूर्वी लक्ष्मण पांडुरंग उर्फ ल. पा. वालेकर यांनी किल्ले रायगड वृत्तपत्र सुरू केले. पनवेलच  नव्हे तर रायगड जिल्ह्यात लोकप्रिय झालेल्या या साप्ताहिकाचे रूपांतर पुढे दैनिकात झाले. पत्रकारितेच्या या अखंड प्रवासाला अर्ध शतकापेक्षा जास्त वर्ष झाली. कालानुरूप दैनिक किल्ले रायगडने स्वतःमध्ये बदल केला. वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या या वृत्तपत्राने आता डिजिटल क्षेत्रात पाऊल टाकले आहे. त्या अनुषंगाने वेब पोर्टल सुरू करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त आता वाचकांना फेसबूक, ट्विटर आणि युट्युब वर  दैनिक किल्ले रायगडने  प्रसिद्ध केलेल्या बातम्या वाचता येतील. एका