इंडिया' हा शब्द गुलामीची निशाणी आहे. त्यासाठी भारत अथवा हिंदुस्थान या शब्दाचा वापर व्हावा - याचिकाकर्ता ‘इंडिया’ नाव इतिहासजमा होणार? सुप्रीम कोर्टात आज महत्त्वपूर्ण सुनावणी; संपूर्ण देशाचं लक्ष अनेकांनी देशाचं नाव भारत किंवा हिंदुस्थान असावं, असं मत व्यक्त केलं होतं. आता देशाला मूळ नाव देण्याची वेळ आली आहे. आपल्या देशातल्या शहरांची नावंदेखील बदलली जात आहेत, याकडेही याचिकाकर्त्यानं लक्ष वेधलं आहे. नवी दिल्ली @ रायगड मत
raigadmat.page 1948 साली संविधानातून इंडिया हा शब्द वगळून फक्त भारत ठेवावा यासाठी मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. देश एक आहे तर नाव एक का नाही? असा प्रश्न याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टात या याचिकेवर आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. इंडिया हा शब्द गुलामीची निशाणी आहे. त्यासाठी भारतअथवा हिंदुस्थान या शब्दाचा वापर व्हावा अशी मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली आहे. घटनेतील कलम १ मध्ये सुधारणा करून इंडिया हा शब्द हटवावा असं याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. आत्ता कलम १ मध्ये म्हटलं आहे की, भारत म्हणजे इंडिया हा राज्यांचा संघ आहे. त्याऐवजी इंडिया हा शब्द काढून टाकावा आणि भारत किंवा हिंदुस्थान इतकाच ठेवावा, देशाला मूळ आणि अस्सल नावावरून भारत म्हणून ओळखले पाहिजे असं याचिकेत म्हणण्यात आलं आहे. सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत असं म्हटलं आहे की, इंग्रजी नाव हटविणे हे प्रतीकात्मक असेल, परंतु ते आपल्या राष्ट्रीयत्वाबद्दल, विशेषत: भविष्यातील पिढीसाठी अभिमानास्पद असेल. वास्तविक, इंडिया या शब्दाऐवजी भारत वापरला जाणं हे स्वातंत्र्यलढ्यात आपल्या पूर्वज