Posts

Showing posts from May 31, 2020

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने स्वच्छता व महापालिका कर्मचाऱ्यांना अर्सेनिक अलबम ३० होमिओपॅथिक गोळ्या

Image
    लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने पनवेल महानगरपा लिकेत स्वच्छतेचे काम करणाऱ्या साई गणेश इन्टरप्रायझेसच्या १९०० स्वच्छता कर्मचारी व त्यांचे कुटुंब तसेच महापालिकेच्या ६०० कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाला रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या अर्सेनिक अलबम ३० होमिओपॅथिक गोळ्या मोफत भेट देण्यात आल्या. यावेळी उपायुक जमीर लेंगरेकर यांच्याकडे औषध सुपूर्द करताना श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेविका रुचिता लोंढे.         

कोरोनाच्या संकटात आमदार प्रशांत ठाकूर यांचा भाजपच्या माध्यमातून अखंड सेवायज्ञ लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ८० हजार मास्कचे होणार वाटप

Image
    पनवेल(प्रतिनिधी) कोरोनाच्या संकटकाळात जनतेचा आधारवड म्हणून ओळखले जाणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सुपुत्र आणि भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व करणारे भाजप नगरसेवक-नगरसेविका, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सोबतीने सेवारूपी यज्ञ अखंडपणे धगधगत ठेवला आहे. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब व गरजूंना त्यांनी मदत केली असून, आगामी काळातही सहकार्याचा ओघ सुरू राहणार आहे.      माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस यंदा आरोग्यदायी असणार आहे. यानिमित्त पनवेल परिसरात ८० हजार मास्कचे वाटप करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येणार आहे. दरम्यान, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक असल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतकांनी शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नये. त्याऐवजी फोनवरून तसेच सो

सेवानिवृत्ती शुभेच्छा

Image
    पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १९ मधील मुकादम दामोदर नारायण कांबळे आज सेवानिवृत्त झाले. त्यांच्या पुढील वाटचालीकरिता सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक नितीन पाटील, मुकीद काझी, नगरसेविका रुचिता लोंढे यांनी शुभेच्छा दिल्या.         

खांदा कॉलनीत रक्तदान शिबीर 

Image
    पनवेल(प्रतिनिधी) माजी खासदार दानशूर व्यक्तीमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच भाजपचे नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शिवराय प्रकल्पग्रस्त सामाजिक मंडळाच् यावतीने आज (दि. ३०) खांदा कॉलनी येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले.            फिजिकल डिस्टन्स नियमांचे पालन करून झालेल्या या शिबिरास नगरसेवक एकनाथ गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, नगरसेविका सीता पाटील, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत शेळके, शांताराम महाडिक, दत्तात्रेय खंडागळे, सचिन गायकवाड, अविनाश गायकवाड, दीपक जांभळे, मनोहर गायकवाड, रूपराव निंभाडे आदी उपस्थित होते. या रक्तदान शिबिरासाठी एमजीएम कामोठे रक्तपेढीचे सहकार्य लाभले. 

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त   रविवारी मोफत आर्सेनिक अल्बम ३० होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप

Image
    पनवेल(प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा दिनांक २ जून रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने भाजपच्या नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्यावतीने रविवार दिनांक ३१ मे रोजी सकाळी १० वाजता ओवे कॅम्प येथील रहिवाशांना मोफत आर्सेनिक अल्बम३० होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळून होणाऱ्या या कार्यक्रमाला  पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित राहणार आहेत.          लोकनेते रामशेठ ठाकूर हे रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आणि रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आहेत. त्यांना कर्मवीर भाऊराव यांची शिकवण असल्यामुळे ते नेहमीच समाज हिताचे कार्य करत आले आहेत व त्याला अनुसरूनच त्यांच्या शिकवणी नुसार त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे हा बोध घेत खारघर येथील ओवे कॅम्प येथील रहिवाश्यांना रोगप्रतिकार शक्ति वाढावी, यासाठी आयुष मंत्रालयाने सांगितल्या प्रमाणे आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथीक गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. 

मोरबे धरणाची पाणीगळती थांबणार पाटबंधारे विभागाकडून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात जलशयाखालील गावांवरील पुराचा धोका टळणार  आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश

Image
    पनवेल(प्रतिनिधी) मोरबे धरणाची पाणीगळती थांबण्याबरोबरच जलाशयाखालील गावांवरील पुराचा धोका टळणार आहे. याकामी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.             पनवेल तालुक्यातील मोरबे धरणाला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने पाण्याचा अपव्यय होतो. याव्यतिरिक्त पावसाळ्यात बंधारा फुटुन त्याचा आजूबाजूच्या गावांना धोका निर्माण झाला होता. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी  विधानसभेत तारांकित प्रश्न  उपस्थित करून याकडे शासनाचे लक्ष वेधले होते. संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा सुद्धा केला. जर यंदा याबाबत उपाययोजना केल्या नाही. तर आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार पाटबंधारे विभागाने धरणाची डागडुजी सुरू केली आहे.        पनवेल तालुक्यातील खैरवाडी- गारमाळ परिसरात जवळपास ५० एकरावर हे धरण बाधण्यात आले आहे. या धरणाच्या  पाण्याचा वापर आजूबाजूच्या गावातील शेतीसाठी तसेच मोरबे, दुंदरेपाडा, चिंचवली या गावांना पिण्यासाठी केला जातो. विशेष म्हणजे याच धरणातील पाण्यावरच गारमाळ, मोरबे,येरमाळ आदी परिसरातील नागरिक दुबार भाताचे पीक घेतात. या धरणाच

आईच्या पुण्यतिथीनिमित्त भाजप तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांच्याकडून वृध्दाश्रमाला जीवनावश्यक वस्तूंची भेट

Image
  पनवेल(प्रतिनिधी) भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील यांनी त्यांच्या मातोश्री अनुसया हरि चंद्र पाटील यांच्या १३ व्या पुण्यतिथी निमित्त भानघर येथील करुणेश्वर वृद्धश्रमाला अन्न धान्य, फळे, सॅनिटायझर, रोग प्रतिकारक शक्ती औषधे आदी वस्तू सामाजिक बांधिलकी म्हणून भेट दिली.               करुणेश्वर वृद्धाश्रमात ४० ज्येष्ठ नागरिक आहेत. कोरोना विषाणू संसर्ग व लॉक डाऊन परिस्थितीचा विचार करता येथील ज्येष्ठ नागरिकांकरिता जीवनावश्यक अन्न धान्य, फळे, रोग प्रतिकार शक्ती औषधे, सॅनिटायझर आदी महत्वपूर्ण वस्तूंची राजेंद्र पाटील यांनी भेट दिली. यावेळी फिजिकल डिस्टन्स नियमाचे पालन करण्यात आले.  यावेळी तालुका युवा मोर्चाचे सरचिटणीस महेश पाटील, अक्षय पाटील, राहुल पाटील, पुरुषोत्तम पाटील उपस्थित होते.         

सामाजिक बांधिलकी जपत "मदत नव्हे आपले कर्तव्य" समजून केली समाजसेवा - मोहम्मद उमर(सादिक) खान व विजय पाल

Image
     आमचा देश "सर्व धर्म समभाव" असल्याचे दिला संदेश.  मुंबई पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्या परप्रांतीयांनसाठी जेवणाची व पाण्याची व्यवस्था केली गेली. त्यावेळी हिंदी भाषिक परप्रांतीयांनी "आप हमारे लिये भगवान के दूत बनकर आये हो"असा आशिर्वाद देत व्यक्त केले आभार.    पनवेल / सय्यद अकबर            कोरोना विषाणूच्या साथीने संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली गेली व लॉकडाउन टप्या टप्याने म्हणजे चार टप्यात घोषित केला गेला. अशा वेळी अत्यावश्यक सेवेत समाविष्ठ असणारे उद्योग धंदे सोडून बाकी सर्व छोटे मोठे उद्योगधंदे बंद करण्यात आले. त्या मध्ये रिक्षावाले,छत्रीवाले, बूटपॉलिशवाले, केस कर्तनालाय,खाजगी व शासकीय ठेकेदारांनकडे काम करणारे मजूर, बिगारी कामगार, वेटबिगारी, झोपडपट्टीतील रोजंदारीवर व भंगार गोळा करणारे कामगार, भिकारी तसेच रोज कमवून खाणाऱ्या गोरगरीब गरजू लोकांचे पैसे व अन्नधान्य़ा अभावी अतोनात हाल झाले. अशा वेळी बऱ्याच समाजसेवी संस्था आपली सामाजिक बांधिलकी जपत "मदत नव्हे आपले कर्तव्य" समजून पुढे आले. आणि या सर्व संस्थेत गेली अनेक वर्षे लोकांच्या सुखा दुःखात राहून काम