Posts

Showing posts from May 29, 2020

पनवेल मधील वृत्तपत्र विक्रेत्याना  पत्रकार व संस्कार फाउंडेशन कडून अन्यधान्य वाटप 

Image
  पनवेल :-अनिल राय   दिवसा दिवस कॉरोनाचा संख्यात वाढ होत असल्याने टाळे बंदी करण्यात आले त्या मुळे सर्व नागरिकांना कामधंध्ये बंद झाले  मुळे हाथावर पोट असणाऱ्या गरजूना शासनाने व काही समाज सेवक दानशूर ब्याक्ती कडून वारंवार मदत करण्यात आले त्याचप्रमाणे पनवेल मधील काही वृत्तपत्र विक्रेत्याला ही कॉरोनामुळे काम धंदा ठप्प झाले त्या मुळे उपासमारीच्या समस्या निर्माण होऊ नये त्या साठी पनवेल प्रेस क्लबचे संस्थापक तथा  दै, वादळवराचे संपादक विजय कडू (आप्पा)  व पनवेल टाइम्स चे संपादक गणेश कोळी पनवेल प्रेस क्लब चे अध्यक्ष तथा कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर यांच्या नेतृत्व खाली पनवेल प्रेस क्लबचे उपाध्यक्ष तथा स्टार पनवेल चे संपादक अनिल राय यांच्या सहकार्याने आज गुरुवार दि,२८/५/२०२० रोजी वादळवारा कार्यालयात संस्कार फाउंडेशन चे संथापक रवि शर्मा  यांच्या वतीने  अन्यधान्य वाटपाचे नियोजन करण्यात आले त्या वेळी पनवेल मधील वृत्तपत्र विक्रेते उपस्थित राहून  तांदूळ गव्हाच्या पिट डाळ मीट तेल कांदा बाटा यांचे वाटप करण्यात आले त्यावेळी पनवेल प्रेस क्लबचे संस्थापक व दै वादळवारा चे संपादक विजय कडू (अप्पा) पनवेल टाइम

वंचित आघाडीचे नेते दक्षिण मुंबईतील आंबेडकरी चळवळीचे एकनिष्ठ कार्यकर्ते दिवंगत.जितेंद्र जी दोडके यांच्या स्मरणार्थ मा.शशिकांत लिंबारे यांच्या पुढाकाराने समर्पण आणि लोककल्याण फाऊंडेशन या सामाजिक संस्था तर्फे महिलांना संपुर्ण सॅनिटरी कीटचे वाटप... 

Image
    महेंद्र कांबळे - मुंबई प्रतिनिधी   कोरोना व्हायरस आणि त्यामुळे असलेल्या लॉक डाऊन परिस्थितीत गरीब  नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि असे असताना त्रस्त नागरिक ससॅनेटायझर घेणार कसे   हा प्रश्न लक्षात घेऊन मा.शशिकांत लिंबारे यांनी दिवंगत  जितेंद्र दोडके जे शेवटच्या स्वासापर्यंत वरळीत तालुक्यात गरिबांना अन्न धान्य किटचे वाटप करीत होते त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुतणे विशाल दोडके यांच्या हस्ते सॅनिटरी कीटचे वाटप करण्यात आले त्यावेळी मा.शशिकांत लिंबारे बरोबर लोककल्याण फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

कुटुंबातील व्यक्तीच्या पुण्यतिथी निमित्त कोळखेतील तरुणांचे रक्तदान

Image
  कुटुंबातील व्यक्तीच्या पुण्यतिथी निमित्त कोळखेतील तरुणांचे रक्तदान      पनवेल(पनवेल) कुटुंबातील व्यक्तीच्या पुण्यतिथी निमित्त कोळखे येथील डॉ. विशाल पाटील व  विश्वनाथ पाटील या दोन तरुणांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे.            करोना महामारीच्या काळात अनेक हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.रक्ताची ही तूट भरून काढण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्यावतीने १ हजार रक्त बाटल्या संकलित करण्याचा मानस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे. या अनुषंगाने युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आनंद ढवळे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात नियोजन करण्यात येत आहे.             भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील यांच्या मातोश्री अनुसया हरिचंद्र पाटील यांच्या १३ व्या पुण्यतिथीला त्यांच्या कुटुंबातील डॉ. विशाल पाटील आणि विश्वनाथ पाटील या युवकांनी पुण्यतिथीदिनाच्या पूर्वसंध्ये ला रक्तदान करून आदर्शवत काम केले आहे. यावेळी युवा नेते आनंद ढवळे, रोहित घरत आणि रेहान पाटील उपस्थित होते. 

कामगार, वाहनचालक, सुरक्षा रक्षकांना अर्सेनिक अलबम ३० या होमिओपॅथिक औषधाचे वाटप

Image
  कोरोना विषाणूशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती महत्वाची आहे. त्या अनुषंगाने साई बहुउद्देशीय मित्र मंडळाचे पदाधिकारी व साई सुरक्षा रक्षक एजन्सीचे मालक राजेंद्र पाटील यांच्यावतीने तळोजा एमआयडीसी मधील कामगार, वाहनचालक, सुरक्षा रक्षकांना अर्सेनिक अलबम ३० या होमिओपॅथिक औषधाचे वाटप करण्यात आले.   

म्हसळा तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह 07 रुग्ण, तर दोघांचा मृत्यू

Image
   तालुक्यातील पाभरे, गायरोने, तळवडे, कणघर, ठाकरोली गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर दुर्गवाडी आणि वरळ गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे.   म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर     सध्या सर्वत्र कोरोना कोव्हीड 19 साथ रोग पसरला असून या रोगाचे विषाणू सगळीकडे पसरत आहेत. कोरोना संसर्गजन्य विषाणूंची साखळी रोखण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. सुरुवातीला राज्यातील मुंबई, पुणे या शहरात कोरोनाचे विषाणू फैलावत होते मात्र आता हळूहळू राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव सुरू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 07 झाली असून दुर्गवाडी आणि वारळ गावातील प्रत्येकी एक असे एकूण दोन पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे.     याबाबत सविस्तर वृत्त असे की ग्रुपग्रामपंचायत पाभरे हद्दीतील पाभरे (कोळीवाडा) आणि गायरोने गावातील दोन व्यक्तींचा कोरोना कोव्हीड -19 टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मुंबईतील वडाळा येथून 18/05/2020 रोजी 48 वर्षीय व्यक्ती आपल्या कुटुंबांसमवेत मूळ गावी मौजे पाभरे य

सायनीत नऊ कोरोनाबाधित

Image
  रसायनी--राकेश खराडे         कोरोना या विषाणूची जगात जबर दहशत पसरली आहे.ह्या विषाणूनी क्षणात होत्याचं नव्हतं केल.सर्वसामान्य माणसाची गत ना घर का,ना घाट का होत असतानाच उच्चब्रू लोक सुध्दा आपल्या दैनंदिन जिवन जगत असताना हवालदिल होत आहेत.दोन महिन्यांपर्यंत सुरक्षित असलेल्या रसायनीत अखेर कोरोनाने शिरकाव केला आहे.वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील शिवनगर वाडी येथील तिघांची कोरोना चाचणी पाॅजिटीव्ह,दुर्गांमाता काॅलनी दोन पाॅजिटीव्ह,कैरे जवलील एका कारखान्यातील एक पाॅजिटीव्ह तर वावेघर ग्रामपंचायत हद्दीतील दापिवली येथील एकाच कुटूंबातील तिघांची  चाचणी पाॅजिटीव्ह आली असून रसायनीत एकूण नऊ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून परीसरात भितीचे वातावरण आहे.या पाश्र्वभूमीवर शिवनगरवाडी परीसर कोरोना विषाणु बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.या कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.तर कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्याचे काम प्रशासनाच्यावतीने मंडळ अधिकारी नितिन परदेशी घेत आहेत.      संपुर्णं देशात कोरोनाने हाहाकार माजला आहे.लाॅकडाऊन कालातीत दोन म

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन

Image
  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रतिमेला  पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी फिजिकल डिस्टन्स नियमांचे पालन करण्यात आले.  भाजपचे शहर मंडल अध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस नगरसेवक नितीन पाटील, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, तेजस कांडपीळे तसेच अमरिश मोकल उपस्थित होते.         

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उरणमध्ये रक्तदान शिबिर

Image
  पनवेल(प्रतिनिधी) करोना महामारीच्या काळात अनेक हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.रक्ताची ही तूट भरून काढण्यासाठी  भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उरणच्या माध्यमातून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार दिनांक ३१ मे रोजी उरणमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.     जेएनपीटी टाऊनशिप मल्टिपर्पज हॉल येथे सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर होणार असून या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन भाजपचे उरण तालुका मंडल अध्यक्ष रवी भोईर, युवा मोर्चाचे उरण तालुकाध्यक्ष शेखर पाटील यांनी केले आहे.

तळा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ७ वर

Image
  तळा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ७ वर. चरई येथील बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह. (तळा श्रीकांत नांदगावकर) तळा तालुक्यातील चरई बुद्रुक येथील २५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असून तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या ७ झाली आहे.सदर महिला ही घाटकोपर येथून आपल्या गावी चरई बुद्रुक येथे आली होती.यापूर्वी चरई बुद्रुक येथे आढळून आलेल्या कोर