रसायनीत आठ जणांचा कोरोना अहवाल पाॅजिटीव्ह, खबरदारी म्हणून दोन दिवस जनता कर्फ्य
रसायनी--राकेश खराडे दोन महिन्यांपर्यंत सुरक्षित असलेल्या रसायनीत अखेर कोरोनाने शिरकाव केला आहे.वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील शिवनगर वाडी येथील तिघांची कोरोना चाचणी पाॅजिटीव्ह,दुर्गांमाता काॅलनी दोन पाॅजिटीव्ह,तर वावेघर ग्रामपंचायत हद्दीतील दापिवली येथील एकाची चाचणी पाॅजिटीव्ह आली असून त्याचे आई-वडीलही कोरोना तपासणी अहवालात पाॅजिटीव्ह आले आहेत. रसायनीत एकूण आठ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून परीसरात भितीचे वातावरण आहे.या पाश्र्वभूमीवर शिवनगर वाडी परीसर कोरोना विषाणु बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून शिवनगर वाडी,दुर्गांमाता काॅलनी व दापिवली या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. संपुर्णं देशात कोरोनाने हाहाकार माजला आहे.लाॅकडाऊन कालातीत दोन महिने रसायनीकरांनी काटेकोर पालन केले.परंतु दोन महिन्यांनंतर कोरोनाने रसायनीत शिरकाव करुन रहिवाशांना भयभीत केले आहे.शिवनगरवाडीत राहणारा 38 वर्षींय व्यक्ती घाटकोपरला काही दिवस आपल्या बाईंकवरुन कामाला जात होता.त्याला लक्षणे जाणवल्याने त्याने आपली कोरोना तपासणी केली.त्याच्या अहवाल पाॅजिटीव्ह आल