आम्ही आमचे प्रयत्न करीत आहोत लोकांनी सहकार्य करावे - तहसीलदार म्हसळा
जे Red Zone मधून आलेले आहेत. त्यांनाच आम्ही 28 दिवस होम क्वारनटाइन रहा असे सांगत आहोत. तर जे Green Zone किंवा Orang Zon मधून आलेले आहेत त्यांना 14 दिवस असे आदेशच वरून आलेले आहेत. तलाठी, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्या मार्फत त्या त्या गांवात 'गाव कमिटी' स्थापन करून होम क्वारनटाइन असणाऱ्या आणि इतर ग्रामस्थ मंडळींना सामान ने-आण करण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेत आहोत. म्हसळा / जितेंद्र नटे @ रायगड मत raigadmat.page सध्या कोरोनाची चिंता ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. आधीच वैतागलेले 2 महिने लोकडाऊन अनेक मुंबईकर गावी गेल्यामुळे प्रशासनावर ताण पडत आहे. हे जरी खरे असले तरी तेही आपलेच आहेत त्यांना आपण समजून घेतले पाहिजे. अनेक लोकांनी 'रायगड मत'शी संपर्क साधून तसेच व्हाट्सअप करून होम क्वारनटाइन 14 दिवस कि 28 दिवस या बाबत आक्रोश व्यक्त केला. म्हणून 'रायगड मत' चे संपादक जितेंद्र नटे यांनी स्वतः म्हसळा तहसीलदार गोसावी यांच्याशी बातचीत केली.... काय उपाय योजना आहेत? या विषयी विचारले असता त