पाणी बिल वाढवण्याऐवजी ते शंभर टक्के माफ करा सिडकोने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भाजप नगरसेवक समीर ठाकूर आक्रमक मुख्यमंत्री, आणि सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना खरमरीत पत्र
पनवेल(प्रतिनिधी) सिडकोने टाळेबंदी सुरू असताना भरमसाठ पाणीपट्टी वाढवली आहे. या तिप्पट पाणी देयकला पनवेल महापालिकेचे नगरसेवक समीर ठाकूर यांनी विरोध केला आहे. इतकेच नाही तर वसाहती विकसित करणाऱ्या सिडको प्राधिकरणाने आपली बांधीलकी उचलत शंभर टक्के पाणी बिल माफ करावे अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांना खरमरीत पत्र पाठवले आहे. याबाबत सिडकोने रहिवाशांवर लादलेला जुलमी निर्णय मागे घेतला नाही. तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी दिला आहे. सध्या कोरोना या महामारी रोगाने थैमान घातले आहे. गेल्या दोन महिन्यापासून या पार्श्वभूमीवर टाळेबंदी सुरू आहे. अनेकांचा कामधंदा बुडालेला आहे. परिणामी त्यांच्या उपासमारीची वेळ आली आहे. हे संकट नेमके कधी टळेल याबाबत कोणालाही काही सांगता येत नाही. एकंदरीतच या वैश्विक संकटामध्ये अनेक कुटुंबांचे आर्थिक हाल सुरू झाले आहेत. पोटाचे खळगे कसे भरायचे, आपला व कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करायचा कसा असा यक्षप्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा राहिलेला आहे. त्यातच एकविसाव्या