निराधार परप्रांतीय मजुरांना संतोष शेट्टी यांचा आधार वण वण फिरत असलेल्या ४५ श्रमिकांची राहण्याची व जेवण्याची केली व्यवस्था पोलिस प्रशासनाच्या मदतीने मूळगावी पाठवणार
पनवेल( प्रतिनिधी) महाराष्ट्रात अडकलेल्या परराज्यातील कामगारांना त्यांच्या मूळ गावी पाठवले जात आहे. त्यासाठी श्रमिक रेल्वे गाड्या दररोज सोडल्या जात आहेत. असे असतानाही काही गरीब आणि निराधार मजुरांच्या असहायतेचा फायदा घेऊन काहीजण त्यांची फसवणूक करीत आहेत . असाच प्रकार बुधवारी नवीन पनवेल परिसरात घडला. बिहारला जाणाऱ्या ४५ कामगारांना दोन टेम्पो मधून सोडतो असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले. आणि त्या टेम्पो चालकाने अक्षरशः पोबारा करून त्या कष्टकऱ्यांची घोर फसवणूक केली. त्या विवंचनेत दिशाहीन झालेले मजूर नवीन पनवेल मध्ये वणवण फिरत असल्याचे लक्षात येताच पनवेल महापालिकेतील भाजपचे नगरसेवक संतोष शेट्टी आणि इतर भाजप कार्यकर्ते त्यांच्या मदतीला धावून गेले. त्यांची राहण्याची व्यवस्था करून जेवण व इतर सुविधा उपलब्ध केल्या. पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या मदतीने त्यांना मूळ गावी पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे या कामगारांनी समाधान व्यक्त केले. कोरोना विषाणूंचे संक्रमण होऊ नये यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशभर लाॅकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेक जण त्यामध्ये अडकले आहेत. विशेष करून महारा