Posts

Showing posts from May 22, 2020

एक हात मदतीचा* साई संस्थान पुनाडेचे संस्थापक सदानंद पाटील यांच्या माध्यमातून ६० आदिवासी बांधवाना अन्नधान्याचे वाटप

Image
      कळंबोली / विकास पाटील    कोरोना विषाणूने संपूर्ण जगात दहशत निर्माण केली आहे. कोरोना विषाणूवर मात करताना देशासह राज्यात लाँकजाऊन आहे त्यामुळे हाताला काम नसल्याने  पुनाडे ( उरण ) आदिवासी बांधवावर उपासमारीची वेळ आली आहे  अपात्कालीन संकट कालात सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाप्रती काही देणं लागते या भावनेतून साई संस्थान पुनाडेचे संस्थापक सदानंद पाटील यांच्या हस्ते महेश्नरी फाऊंडेशन व जीवन गागरे यांच्या सहकार्यातून ६० आदिवासी बांधवाना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.     लॉकडाऊमुळे सर्व व्यवसाय बंद असल्याने त्याचा सर्वाधिक फटका हातावर पोट असलेल्या द-याखो-यात व डोंगरमाध्यावर बसलेल्या आदिवासीना बसत आहे. लाँकडाऊनमध्ये गावच्या सीमा बंद केल्याने रानमेवा,  सरपणे विकूणे व मिळेल तिथे काम करून आपले कुटूंब चालविणा-या पुनाडे आदिवासी बांधव कोरानाच्या दहशत परिस्थितीत अगदी हतबल झाला आहे. निराधार महिलाना मुलांचा उदरनिर्वाह कसा होईल हा यक्ष प्रश्न पडला आहे.  या आदिवासी व निराधाराना एकवेळच जीवन मिळणे  मुश्किल होवून उपासमारीची वेळ आली आहे असा  संकट प्रसंगी साई संस्थान पुनाडेचे सदानंद पाटील

जनता व्हेन्टिलेटवर तर मुख्यमंत्री होम कॉरेन्टाईन - आमदार प्रशांत ठाकूर   कोरोना नियंत्रणात सपशेल अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारचा निषेध 

Image
     पनवेल(प्रतिनिधी) राज्यातील ठाकरे महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळीपणा कारभारामुळे जनता व्हेन्टिलेटवर तर मुख्यमंत्री होम कॉरेन्टाईन झाले आहेत, अशी जोरदार टीका भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (शुक्रवार, दि. २२) येथे केले.             कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणामध्ये सपशेल अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी ठाकरे सरकारला जाब विचारण्यासाठी उत्तर रायगड भाजप आणि पनवेल तालुका व शहर भाजपच्यावतीने पक्ष कार्यालय येथे फिजिकल डिस्टन्स नियमांचे पालन करून 'महाराष्ट्र बचाव' आंदोलन करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते.  यावेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर मंडल अध्यक्ष जयंत पगडे, महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, युवा नेते दशरथ म्हात्रे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल,युवा मोर्चाचे उत्तर जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर आदी उपस्थित होते.                 महाराष्ट्र वाचवा महाराष्ट्र वाचवा, कोरोना रोखण्यात निष्फळ ठरलेल्या उद्धव ठाकरे सरकारचा धिक्कार असो धिक्कार असो, महाविकास आघाडी सरक

म्हसळा तालुका नगरपंचायत हद्दीतील दुर्गवाडीत सापडला कोरोना पाॅझीटिव्ह

Image
       शहरासह तालुक्यात घबराट उडाली म्हसळा@रायगड मत / श्रीकांत बिरवाडकर    मुंबईतील बोरीवली येथील हॉटस्पॉट वस्तीतून आलेला दुर्गवाडी गावातील कॉरंटाईन असलेल्या ६० वर्षीय ईसमाचा दि १९ मे रोजी अचानक श्वसनाचे त्रासाने मृत्यू झाला होता. म्हसळा नगरपंचायत प्रशासनाने मृत्यू पश्चात स्वॅब घेऊन नवी मुंबई येथे तपासणीसाठी पाठविला होता. तो कोरोना पाॅझीटिव्ह निघाल्याने म्हसळा करांचे मनात घबराट झाली. म्हसळा तालुक्यातील नगरपंचायत हदीतील दुर्गवाडी गावातील ६० वर्षीय ईसमाचा स्वॅब कोरोना पाॅझीटिव्ह निघाल्याचे तालुका प्रशासनाने सांगितले त्यामुळे शहर आणि तालुक्यामध्ये भीती निर्माण झाली आहे. तालुक्यातील ३९ ग्रामपंचायती व म्हसळा नगरपंचायतीतील म्हसळा शहरासह नगरपंचायत हद्दीतील गौळवाडी, दुर्गवाडी, चिराठी, सावर गौळवाडी, बौध्द वाडी, या विविध वस्तींवर किमान 2000 चाकरमानी मुंबई वरून आले आहेत असे म्हटले जाते. त्यामध्ये दुर्गवाडी येथील ६० वर्षीय वृद्ध व्यक्ती १६ मे रोजी बोरीवली येथील हॉटस्पॉट वस्तीतून मुलगा, मुलगी व जावई यांच्या समवेत म्हसळा शहरांत आला, मुलगी व जावई त्यांच्या चिरगाव या गावी गेले, मयत इसम व मुलगा रिक्षान