बदलत्या वातावरणामुळे म्हसळ्यातील आंबा बागायतदार हवालदिल
शासनाकडून मदतीची अपेक्षा म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर दक्षिण रायगड मधे मागील काही दिवसांपासून खराब आणि बदलत्या हवामानामुळे म्हसळा तालुक्यातील आंबा बागायतदार हवालदिल झाले असून तयार झालेला आंबा कसा विक्री करायचा या चिंतेत आहेत. नुकताच दि,14 व 16 मे 2020 रोजी कोकणात जोरदार वाऱ्यासाहित पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा पीक तयार झालेला असून पाऊसामुळे खराब झाला व जोरदार वाऱ्यामुळे आंबा फळ मोठ्या प्रमाणात गळून पडला आहे. तसेच गुरांच्या वैरणी सुद्धा भिजल्या आहेत. सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसमुले लॉकडाऊन सुरू असून अनेक मोठमोठ्या बाजारपेठ बंद आहेत. ग्रामीण भागातील बागायतदार मोठ्या संकटात सापडलेल्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट खूप मोठा असून या परिस्थितीतुन सावरण्यासाठी बागायतदारांना शासनाने आर्थिक मदत दिली पाहिजे अशी मागणी होत आहे. प्रतिक्रिया :- एकीकडे देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट आलेले आहे. त्यातच आता थोड्या दिवसात पावसाळा सुरुवात होईल. सध्या कोकणात आंबा फळ पीक तयार झाला असून त्याची विक्री करण्यासाठी शेतकरी चिंतेत आहे. म्हसळा तालुक्यात मागील काही दिवसां