Posts

Showing posts from May 18, 2020

जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि Hahnemanian Homoeo आणि ऑल ईज़ वेल होमिओपथिक यांच्याकडून आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी औषधाचे वितरण

Image
      पनवेल : संपूर्ण देशभर कोरोना विषाणूचा हाहाकार सुरूच आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या विषाणू सोबत लढण्याकरिता जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि Hahnemannian Homoeo forum आणि ऑल ईज़ वेल होमिओपथिक या संस्थेकडून  आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथीचे औषध नागरिकांना वितरण करण्यासाठी डॉ. प्रतिमा  सचिन म्हात्रे आणि डॉ. मृनल नार्वेकर यांनी जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेकडे सुपूर्द केले आहे.               संबंधित औषध हे होमिओपॅथीचे औषध असल्यामुळे त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. तसेच हे औषध कोणत्याही औषधासोबत घेता येते, त्याच प्रमाणे कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला तसेच इतर आजार जसे मधुमेह, उच्च रक्तदाब, संधिवात इ. असलेल्या व्यक्तींनाही देता येते. असे डॉ. प्रतिमा म्हात्रे आणि डॉ.मृणाल नार्वेकर यांनी सांगितले आहे.                 सध्या covid-19 या आजाराचा संसर्ग वाढत आहे नागरिकांनी केंद्रीय मंत्रालयाच्या आयुष्य मंत्रालया मार्फत केलेल्या सूचनांचे पालन केल्यास हा आजार आटोक्यात आणू शकतो नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये आपले व आपल्या कुटूंबियांनची काळजी घेत

दिलीप चक्रवर्ती म्हणजे माणुसकीचा झरा - अनिल राय  पनवेलच्या पत्रकारांना अन्नधान्य वाटून केली मदत

Image
    जितेंद्र नटे / पनवेल  17 मे ही तारीख पत्रकारांसाठी फार महत्वाचा आहे. वृत्तपत्राचे जन्मदाते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची आज पुण्यतिथी होय. याच दिवशी मोठ्या मनाचा माणुसकी जपणारे आदरणीय दिलीप चक्रवर्ती यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. आजच्या दिवशीच त्यांनी पनवेलच्या पत्रकारांना अन्नधान्य वाटून मदत केली. पत्रकार हा देशाचा चवथा आधारस्तंभ आहे. कोरोनासारख्या संकटात पत्रकार ही आर्थिक संकटात आहेत. म्हणूनच पनवेल प्रेस क्लब चे उपाध्यक्ष आणि 'स्टार पनवेल'चे स्टार संपादक यांनी दिलीप चक्रवर्ती यांच्याकडे शब्द टाकला आणि शब्दाला जागत त्यांनी पत्रकारांना मदत ही केली. सरकार, पोलीस, डॉक्टर्स, नर्स सगळेच काम करीत आहेत. मात्र त्यांना पगार मिळतो. या कोरोना महामारीच्या जन जागृती मध्ये पत्रकारांचा मोठा वाटा आहे, मात्र तो नेहमीच उपेक्षित राहिला आहे. पनवेल प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. विजय कडू व अध्यक्ष श्री. सय्यद अकबर यांच्या प्रमुख उपस्थितीत अन्न धान्य वाटप करण्यात आले. यामध्ये 5 किलो तांदूळ, तेल, मीठ, चहापत्ती, कांदे-बटाटी, साखर, डाळ तसेच अन्य वस्तूचा समावेश होता.  दिलीप चक्र वर्ती